कोपरगाव : कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक होती. त्यासाठी मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांच्या संकल्पनेतून शहरातील बाजारतळ येथे विनामूल्य कोविड प्रतिबंधक लस नोंदणी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्राद्वारे २५ दिवसात ६० ते ९३ वर्ष वयोगटातील सुमारे ४६५ ज्येष्ठ नागरिकांनी आधारकार्डचा वापर करून ऑनलाईन नोंदणी करून लसदेखील घेतली आहे.
या केंद्रावर फाऊंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन नाव नोंदणीसाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या केंद्राचा लाभ घेऊन त्यांची सोय झाली, याचेच सर्वाधिक समाधान असल्याची भावना फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी व्यक्त केली आहे.