टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यातील काटाळवेढा गावासाठी जवळपास ४३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. येथील रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, विकास रोहाेकले, सरपंच पीयूष गाजरे, उपसरपंच वैशाली भाईक, ठका कडूसकर, सुदाम गाजरे, भाऊसाहेब डोंगरे, लहू गुंड, भाऊसाहेब कोकाटे, रामदास गाजरे, खंडू भाईक, अर्जुन गाजरे, संभाजी भाईक, किसन डोंगरे, भाऊसाहेब आहेर, बाबाजी आहेर, भास्कर डोंगरे, उपअभियंता रावसाहेब अहिरे, कामाचे ठेकेदार फारुक शेख, बबन वाळुंज आदी उपस्थित होते.
काटाळवेढा ते पळसपूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २० लाख, कातळवेढा ते दत्त मंदिर रस्ता डांबरीकरण १५ लाख, प्राथमिक शाळा डोंगरवाडी नवीन खोली इमारत ८.७५ लाख असा एकूण ४३.७५ लाखांचा निधी मिळाला आहे.