शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लेखापरीक्षकांच्या बनावट सहीने ४० लाखांची बिले मंजूर; नगर महापालिकेच्या पथदिव्यांच्या कामात अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 19:43 IST

नगर शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परीक्षकांच्या बनावट सहीने तब्बल ४० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला.

अहमदनगर : शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परीक्षकांच्या बनावट सहीने तब्बल ४० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला. अंदाजपत्रकीय नोंदवहीमध्ये (बजेट रजिस्टर) सदर कामाची कोणतीही नोंद नसताना बिले निघाल्याने हा अपहार संगनमताने झाल्याचा आरोपही बोराटे यांनी केला.महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी दुपारी एक वाजता सभापती सुवर्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत पहिले दोन तास पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर गंभीरपणे चर्चा झाली. राहिलेल्या एका तासात विषयपत्रिकेवरील विषय मंजूर झाले.शहरातील भिस्तबाग महाल, तपोवन रोड परिसर (प्रभाग क्रमांक १) आणि मल्हार चौक, कायनेटिक चौक (प्रभाग क्रमांक २८) या परिसरात चालूवर्षी पथदिव्यांची कामे करण्यात आली. या कामांची महापालिकेच्या बजेट रजिस्टरमध्ये नोंद आढळून आली नाही. पथदिव्यांच्या बिलावर उपायुक्त, अभियंता, प्रभाग अभियंता, विद्युत विभागाचे प्रमुख, मुख्य लेखा परीक्षक यांच्या सह्या आहेत. पथदिवे बसविल्याची स्थळपाहणी करूनच बिले काढली, असा दावा अधिका-यांनी केला. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय स्थायीच्या विषयपत्रिकेवरील विषय मंजुरीला न घेण्याचा पवित्रा बोराटे यांनी घेतला. मात्र अधिकारी गप्प राहिले. बजेट रजिस्टर मिळविण्यासाठी सदस्यांना अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करावी लागली. महापौरांच्या स्वीय सहायकांनी सदरचे रजिस्टर अखेर स्थायीच्या सभागृहात आणले आणि त्यात पथदिव्यांच्या कामांची नोंद नसल्याचे आढळून आले.पथदिव्यांच्या कामांची बिले मंजूर करताना त्याची अंदाजपत्रकात खतावणी झाली का याची खातरजमा करूनच मुख्य लेखापरीक्षक सह्या करतात. मात्र ४० लाख रुपयांच्या बिलांवर आपण सह्या केल्या नाहीत, असे स्पष्टकरण मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांनी दिल्याने अन्य अधिकारी गरबडून गेले. उपअभियंता आर. जी. सातपुते यांनीही त्या सह्या माझ्या नसल्याचे सभागृहाला सांगितले. त्यामुळे लेखा परीक्षकांच्या बनावट सह्या कोणी केल्या, याची चौकशी करण्याचे आदेश सभापती जाधव यांनी दिले.प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याऐवजी दोषींवर थेट गुन्हा दाखल करण्याचा आग्रह सदस्य बोराटे, मुदस्सर शेख, सचिन जाधव यांनी लावून धरला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याच आदेश सभापती जाधव यांनी दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका