शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली

By साहेबराव नरसाळे | Updated: April 23, 2023 21:05 IST

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरला उपविजेता.

अहमदनगर : येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची ३५ लाख रुपये किमतीची अर्धा किलो वजनाची गदा सोलापूर येथील महेंद्र गायकवाड याने पटकावली. ही अंतिम लढत बेमुदत निकाली होती. महेंद्रने एकचाकी मारून शिवराजला खाली टाकले. त्यामुळे शिवराज जखमी झाला. शिवराज याच्या पायाचे स्नायू तुटल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि महेंद्र गायकवाड याला विजेता घोषित करण्यात आले. 

भाजप, शिवसेना व जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील वाडिया पार्क मैदानात ही स्पर्धा पार पडली. रविवारी स्पर्धेतील अंतिम सामने झाले. यात गादी विभागातील अंतिम लढत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व माऊली कोकाटे यांच्यात झाली. ही लढत राक्षे याने १२-२ अश्या गुणफरकाने सहज जिंकत ३५ लाखांच्या गदेसाठी होणाऱ्या लढतीच्या मैदानात पाऊल ठेवले. 

माती विभागातील उपमहाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही लढत अतिशय अटीतटीची झाली. ३-४च्या गुणफरकाने गायकवाडने ही लढत जिंकत सिकंदर शेखला मात दिली व स्पर्धेतील ३५ लाखांच्या मानाच्या गदेसाठी होणाऱ्या लढतीत प्रवेश मिळविला. स्पर्धेतील सुवर्ण गदेसाठीची अंतिम लढत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (पुणे) व उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्यात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यास सोन्याची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आमदार राम शिंदे हे उपस्थित होते.

टॅग्स :Wrestlingकुस्तीAhmednagarअहमदनगर