जामखेड : तालुक्यातील काटेवाडी येथे जमिनीच्या वादातून पिता-पुत्रांच्या झालेल्या खून प्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात ५ महिलांचा समावेश असून न्यायालयाने त्यांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. इतर २७ आरोपी अजून फरार आहेत. जमिनीच्या वादातून आसाराम यशवंत बहिर (वय ६५) व नितीन आसाराम बहिर (वय २५) या पिता-पूत्रांचा अकरा मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास खून झाल्याची घटना तालुक्यातील काटेवाडी येथे घडली होती. घटनेत कोयता, तलवार, गज, कुºहाडीचा वापर करण्यात आला. या घटनेप्रकरणी ३२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला पैकी मुख्य आरोपी महादेव गहिनीनाथ बहिर कैलास तात्याबा बहिर, बाळू तात्याबा बहिर या तिघांना मंगळवारी दुपारी नान्नज शिवारात सापळा रचून पोलिसांनी अटक केली. तर कमलबाई रघुनाथ बहिर (वय ४७), कुसुमबाई कैलास बहिर (वय ५५), उषा दत्तात्रय बहिर (वय २१), उर्मिला भाऊसाहेब बहिर (वय ३०), सोजयू महादेव बहिर (वय ४२) यांना पोलिसांनी अटक करुन त्यांना जामखेड न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
२७ आरोपी फरार; आठ जणांना अटक
By admin | Updated: July 25, 2023 15:43 IST