शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २५ लाचखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:56 IST

खाबूगिरीसाठी नागरिकांची अडवणूक करून त्यांना लाच मागणाऱ्या २५ लोकसेवकांना वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले़

अरुण वाघमोडेअहमदनगर : खाबूगिरीसाठी नागरिकांची अडवणूक करून त्यांना लाच मागणाऱ्या २५ लोकसेवकांना वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले़ लाच घेणा-यांमध्ये महसूल व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचा-यांची संख्या सर्वाधिक आहे. १ जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ पर्यंतची ही कारवाई आहे.२०१७ या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ लोकसेवकांना लाच घेताना अटक केली होती़ यावर्षी महसूल व पोलीस विभागातील प्रत्येकी ७, जिल्हा परिषदेतील ३, भूमिअभिलेख कार्यालयातील ३, अन्न, औषध प्रशासन विभागातील १, वजनमापे विभागातील १, पाटबंधारे विभागातील १, आदिवासी बालविकास प्रकल्प विभागातील १ तर एक पोलीस पाटील अशा २५ जणांवर कारवाई झाली आहे़ लाच घेण्यात पोलीस विभागातील पोलीस काँस्टेबलपासून ते निरीक्षकांचाही समावेश आहे तर महसूल विभागातील कनिष्ठ लिपिकापासून ते वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना सापळ्यात अडकले आहेत़ शासकीय नोकरांकडून होत असलेल्या लाच मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती सुरू आहे़ यामुळे बहुतांशी नागरिक लाच देणे टाळतात तर काही जण थेट लाच मागण्याविरोधात तक्रार दाखल करत आहेत़ असे असतानाही लाच मागणाºयांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही़ लाचेसह अपसंपदा जमविल्याप्रकरणी सेवानिवृत्त सहाय्यक कामगार आयुक्तांसह अकोले येथील एका शासकीय डॉक्टरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे़लाच घेणा-या तिघांना सक्तमजुरीलाच मागणा-यांवरील गुन्हा सिद्ध झाल्याने वर्षभरात न्यायालयाने तिघांना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे़ श्रीरामपूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता याला श्रीरामपूर न्यायालयाने या वर्षी १० वर्षे सक्तमजुरी व ८५ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे़ तसेच न्यायालयातील एका कर्मचा-यास लाच घेतल्याच्या खटल्यात संगमनेर न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे़ शेतक-याकडून लाच मागणा-या तलाठ्यास संगमनेर न्यायालयात ५ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

सर्वसामान्य जनतेला शासकीय कामासाठी एखाद्या सरकारी कार्यालयात लाच मागितली जात असेल तर संबंधित नोकरदाराची मागणी पूर्ण करू नये, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाऊन संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल़ तक्रार करण्यासाठी १०६० हा नि:शुल्क टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे़- किशोर चौधरी, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर