शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

घोड धरणातून २३ हजार क्युसेक्सने पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:52 IST

घोड धरणाचे २९ पैकी २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून नदीपात्रात सुमारे २३ हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे. यामुळे  घोड नदीला पूर आला आहे. पुरामुळे नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देघोड धरणाचे २९ पैकी २० दरवाजे खुलेघोड नदीला पूर डिंभेतूनही दहा हजार क्युसेकने पाणी सोडलेकाष्टी व नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

श्रीगोंदा (अहमदनगर) : घोड धरणाचे २९ पैकी २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून नदीपात्रात सुमारे २३ हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे. यामुळे  घोड नदीला पूर आला आहे. पुरामुळे नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. 

घोड धरणाची पाणी साठवण क्षमता ७ हजार ६३९ दशलक्ष घनफूट आहे. उपयुक्त पाणीसाठा ५हजार ४६७ दशलक्ष घनफुट असून मृत साठा २ हजार १७२ दशलक्ष घनफूट एवढा आहे. गेल्या चोवीस तासापासून घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरु आहे. तसेच डिंभे धरणातून सुमारे दहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कुकडी आणि इतर ओढे, नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने घोड धरणातून सुमारे २३ हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील काष्टी आणि नदीच्या काठावरच्या वाड्या वस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.हे पाणी सोडण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे तीन फुटापर्यंत तर चौदा दरवाजे दोन फुटापर्यंत असे तब्बल वीस दरवाजा खुले करण्यात आले आहेत. त्यामधून २२ हजार ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सांडव्यामध्ये सोडण्यात येत आहे.

दरम्यान धरणाची सुरक्षा ठेवण्यासाठी विभागाचे स्थापत्य सहाय्यक जी.डी. भापकर, बाळासाहेब जगताप यांच्यासह १५ कर्मचारी धरणक्षेत्रावर तैनात आहेत. याशिवाय अभियंता किरण तरटे, उपअभियंता जे.व्ही.बरड वेळावेळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेत आहेत.