संगमनेर : तळेगाव प्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा सोमवारपासून अचानक बंद केल्याने दुष्काळग्रस्त २१ गावांमध्ये निर्जळी आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, हा शासनाचा उद्देश होता. या आवर्तनाचा लाभ तळेगाव पट्यातील टंचाईग्रस्त गावांना मिळाला. मात्र काल अचानक तळेगाव प्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पुन्हा पाणी टंचाई जाणवू लागली. निंबाळे व कोल्हेवाडी शिवारातील काही शेतकऱ्यांनी योजनेकरिता पाणी उचलण्यास मनाई केल्याचे समोर आले आहे. याची सखोल चौकशी होवून पाणी बंद करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून अन्यथा पंचायत समितीत आंदोलन छेडण्याचा इशारा वडझरीचे उपसरपंच शरद गोर्डे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे. (प्रतिनिधी)
२१ गावांचा पाणी पुरवठा बंद
By admin | Updated: June 3, 2016 23:24 IST