तळेगाव दिघे : छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व तळेगाव - वडगावपान गटाचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्यातर्फे संगमनेर येथील तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना २१ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
कोरोना संकटामुळे तमाशा फड मालक व कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तमाशा कलावंतांना जीवन जगणे अवघड बनले. त्यामुळे मदतीचा खारीचा वाटा म्हणून छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व तळेगाव - वडगावपान गटाचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्यातर्फे तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना २१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, सत्यम वारे व छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनी सदर मदतीची रक्कम रघुवीर खेडकर यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी सुपुर्द केली. प्रसंगी सत्यम वारे, डॉ. संतोष खेडलेकर, ओमप्रकाश जाजू, संपतराव दिघे, रावसाहेब दिघे उपस्थित होते. कोरोना संकट काळात आर्थिक मदत दिल्याबद्दल तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांचे आभार मानले.
फोटो : तळेगाव
संगमनेर : येथे तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांच्याकडे मदतीची रक्कम सुपुर्द करताना सरपंच बाबासाहेब कांदळकर, सत्यम वारे, सचिन दिघे सहित कार्यकर्ते दिसत आहेत.