शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात चारा छावण्यांवर ३१७ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:19 IST

अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी व चाºयाअभावी पशुधन जगवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या छावण्यांवर आॅगस्टअखेर सुमारे ३१७ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे.

अहमदनगर : उन्हाळ्यात पाणी व चा-याअभावी पशुधन जगवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या छावण्यांवर आॅगस्टअखेर सुमारे ३१७ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्यात छावण्यांत सुमारे साडेतीन लाख जनावरे दाखल होती. दरम्यान, आतापर्र्यंत २६० कोटी रूपये शासनाकडून प्राप्त झाले असून त्यातील २१७ कोटींचे वाटप छावणीचालकांना झाले आहे. २३ आॅक्टोबरनंतर जिल्ह्यातील सर्व छावण्या बंद झाल्या. जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस न झाल्याने जानेवारी २०१९ पासूनच दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पिण्यासाठी पाणी, तसेच जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने शासनाने फेब्रुवारीपासून राज्यात छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी छावण्या सुरू करण्यास प्रतिसाद नव्हता. परंतु मार्च, एप्रिलपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरू झाल्या. मे महिन्यात त्या वाढत जात जूनमध्ये छावण्यांचा आकडा सर्वाधिक ५०४ पर्यंत पोहोचला. त्यात लहान-मोठी मिळून सुमारे साडेतीन लाख जनावरे दाखल होती. प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात दुष्काळी स्थिती तीव्र असल्याने नगर, जामखेड, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा या तालुक्यांत छावण्या सुरू होत्या. उत्तरेतील एकमेव संगमनेर जिल्ह्यात छावण्या होत्या. परंतु ती संख्या केवळ २ होती. पाथर्डीत सर्वाधिक १०७ छावण्यांत ६८ हजार जनावरे होती. त्यानंतर कर्जतमध्ये ९७ छावण्यांत ६१ हजार, तर सर्वात कमी नेवाशात एका छावणीत ४१८ जनावरे होती. फेब्रुवारी ते जूनअखेर या पाच महिन्यांत छावण्यांसाठी शासनाकडून २६० कोटी २४ लाख ८५ हजार ४४३ रूपये अनुदान प्राप्त झाले. त्यातील २१७ कोटी ५० लाख ७९ हजार ६७४ रूपयांचे अनुदान छावणी चालकांच्या खात्यावर वर्ग झाले आहे. एकूण प्राप्त अनुदानाच्या प्रमाणात ही टक्केवारी ८४ टक्के आहे. काही छावणीचालकांकडून अद्याप बिलेच सादर न झाल्याने हे उर्वरित १६ टक्के अनुदान वाटप बाकी आहे. जून ते जुलैसाठी ५७ कोटींची मागणीजूननंतरही २३ आॅक्टोबरपर्यंत छावण्या सुरू होत्या. परंतु जूननंतर काही भागात पाऊस झाल्याने छावण्या हळूहळू कमी होत गेल्या. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ५७ कोटी रूपयांच्या अनुदानाची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप ते अनुदान प्राप्त झालेले नाही. याशिवाय सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांत सुरू असलेल्या छावण्या अनुदानाच्या रकमेची अद्याप शासनाकडे मागणी करण्यात आलेली नाही.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchavaniछावणी