शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पारगावात ५०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:29 IST

पारगाव सुद्रिक परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळिंब, लिंबोणीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा  : पारगाव सुद्रिक परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळिंब, लिंबोणीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कर्ज काढून शेतकºयांनी फळझाडांची लागवड केली होती़ मात्र, पावसामुळे बळीराजाचे ५०० कोटींचे नुकसान होऊन सारा गाव कर्जाच्या ओझ्याखाली सापडला आहे. सुमारे १ हजार ७६१ हेक्टर क्षेत्र असलेल्या पारगाव सुद्रिक खेतमाळीसमध्ये ५०० हेक्टर क्षेत्रात द्राक्षे, ४२५ हेक्टर क्षेत्रात लिंबोणी व ३२५ हेक्टर क्षेत्रात डाळिंब, संत्री पेरूच्या बागा आहेत. हे कृषी वैभव उभे करण्यासाठी ३ लाख ते १ कोटी २५ हजार दरम्यान सर्व शेतकºयांच्या डोक्यावर प्रत्येकी कर्जाचा बोजा आहे. पारगावमधील बळीराजा हिमतीने शेती करीत होता. पण परतीच्या पावसाने फळबागा उद्ध्वस्त केल्या. या बागा वाचविण्यासाठी शेतकºयांनी दिवाळी साजरी न करता औषधेफवारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च केला. सारे पावसाने धुवून नेले. सारा गाव कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के, मंडल अधिकारी आबासाहेब भोरे, सहाय्यक कृषी अधिकारी के.बी.अनारसे, कामगार तलाठी बशीर शेख यांनी पंचनामे करण्याची मोहीम हाती घेतली. पण शासनाच्या मदतीने आमचे नुकसान भरु शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी शहाजी हिरवे, राजेंद्र मोटे यांनी व्यक्त केली. दिवाळीचा सण साजरा केला नाही. पण द्राक्षाला औषधे फवारली. पण काहीच उपयोग झाला नाही. साºया बागा निकामी झाल्या. आता कर्जाची परतफेड कशी करायची? असा प्रश्न आहे, असे शेतकरी भानुदास हिरवे यांनीू सांगितले.श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक नुकसान पारगावात द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे झाले आहे. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे, असे तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के यांनी सांगितले.      

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाRainपाऊस