अहमदनगर: जिल्हा नियोजन समितीची सभा येत्या १९ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता होत आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे. जिल्हा नियोजन समितीची सहा महिन्यानंतर सभा होत आहे. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत ही पहिलीच सभा होत आहे. शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रशासनाने येत्या १७ जानेवारी रोजी सभा घेण्याचे निश्चित केले होते. मात्र सभेच्या तारखेत बदल करण्यात आला असून, येत्या १९ जानेवारी रोजी ही सभा होत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा नियोजनची १९ ला सभा
By admin | Updated: January 12, 2015 13:43 IST