शेडगावची लोकसंख्या सुमारे पाच हजार असून माजी सरपंच विजय शेंडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. गरिबांना छप्परमुक्त करण्यासाठी लक्ष घातले.
प्रधान मंत्री व रमाई आवास योजनेंतर्गत ३ कोटी ३० लाख ६६ हजार खर्च करून गेल्या पाच वर्षांत १९८ घरकुले बांधली. यामध्ये लाभार्थी नागरिकांनी आपले योगदान दिले. त्यामुळे घरकुलांचा दर्जा चांगला आहे. अशोक शेंडे त्यांचे बंधू व वडिलांनी दोन मजली घरकूल बांधून जागेची बचत केली.
............
आता २७० घरकुले मंजूर
माजी सरपंच विजय शेंडे त्यांच्या सहकाऱ्यांनी महाआवास विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान व रमाई आवास योजनेतून १९८ घरकुले बांधून दिली. आता ड योजनेत २७० घरकुले मंजूर झाली आहेत. ही घरकुले गोरगरीब कुटुंबांना मिळणार आहेत.
- संध्या शेंडे, सरपंच, शेडगाव
.........
माझ्या कुटुंबांची घर बांधण्याची परिस्थिती नव्हती, पण पंतप्रधान आवास योजनेतून मला घरकूल मिळाले. माझे घरकुलांचे स्वप्न साकार झाले.
-संतोष शेंडे, लाभार्थी
१४शेडगाव