बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या आदेशावरून स्वच्छता पंधरवडा स्वच्छता रॅलीचे उद्घाटन बटालियनचे नोडल ऑफिसर मेजर संजय चौधरी यांनी केल्याची माहिती कर्नल जीवन झेंडे यांनी दिली.
१ ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांत हा सप्ताह होणार असून, ८५० एनसीसी छात्रसैनिक, ३२ एनसीसी अधिकारी, दोन सेना अधिकारी तसेच १८ ज्युनियर व नॉन कमिशन अधिकाऱ्यांचा समावेश यात करण्यात आला आहे. यात स्वच्छता अभियान, विविध रॅली काढणे, स्वच्छता संभाषण, श्रमदान, स्वच्छता नाटक, वैयक्तिक स्वच्छता, हागणदारीमुक्त प्रचार, प्लास्टिक निर्मूलन, स्वच्छ पाणी वापर, स्वच्छता पेंटिंग, स्वच्छता निबंध लेखन यासारख्या उपक्रमांचा समावेश असल्याचे मेजर संजय चौधरी यांनी सांगितले.
या उपक्रमाकरिता कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, सुभेदार लेफ्टनंट पी. व्यंकटेश, शंकर मैना, गणेश वामन, सतीश गांगर्डे, विष्णू शिडे, प्रतीक शिडे, सुखदेश गांगर्डे, सोनार यांच्यासह सर्व बटालियन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-------------
०८एनसीसी
१७ महाराष्ट्र बटालियनच्या स्वच्छता पंधरवडा स्वच्छता रॅलीचे उद्घाटन बटालियनचे नोडल ऑफिसर मेजर संजय चौधरी यांच्या हस्ते झाले.
Attachments area