अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या सेवकांच्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या २१ जागेपैकी १६ जागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. चार मतदारसंघातील ५ उमेदवारांसाठी २५ मार्चला मतदान होणार आहे. या संस्थेच्या निवडणुकीत सहकार मंडळाने १६ जागा बिनविरोध काढत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बिनविरोध झालेल्यामध्ये बँके चे कार्यलक्षी संचालक बाळासाहेब भोसले यांच्यासह १६ जण बिनविरोध झाले. बँकेचे सीईओ आर. एल. वर्पे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
१६ संचालकांची बिनविरोध निवड
By admin | Updated: March 17, 2016 23:40 IST