शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले कृषी विद्यापीठाला १५१ कोटी : सुधीर मुनगंटीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:54 IST

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी १५१ कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे.

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी १५१ कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे. ेयेथून आयएस अधिकारी बनण्याऐवजी पदवीधर आदर्श शेतकरी तयार व्हायला हवेत. त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्याचे काम करावे, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.कुलगुरू डॉ़ के़ पी़ विश्वनाथा यांनी विद्यापीठातील विविध विकास कामांसाठी १०१ कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली.राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मागोवा २०१८ या कार्यक्रम प्रसंगी अर्थमंत्री बोलत होते. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ११ जिल्ह्यातील वर्षभरातील विविध उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात दिली जाते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ़ के़ पी़ विश्वनाथा होते़ कृषीदर्शनी, दिनदर्शिका व अ‍ॅपचे उद्घाटनही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले़अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, एका कार्यक्रमात साडेतीन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला़ मात्र त्यापैकी एकाही विद्यार्थ्याने शेतकरी अथवा पुढारी होईल, असे सांगितले नाही़ हे चित्र बदलण्याची जबाबदारी विद्यापीठांवर आहे़ शेती क्षेत्रातून ५० टक्के रोजगार निर्मिती होते़ महात्मा फुले यांनी शेती मजबुरी असल्याचे शेतकऱ्यांचे असूड या पुस्तकात लिहिले होते़ शेतीमधून आर्थिक शक्ती निर्माण झाली पाहिजे़ कृषी पदवीधर शेतीत आले तर त्यासाठी मुबलक पैसा देण्यास तयार असल्याची ग्वाही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली़प्रास्तविकात कुलगुरू विश्वनाथा यांनी रिक्त जागा भरून विविध प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन केले़ शरद गडाख, अशोक फरांदे, डी़ डी़ पवार, मिलींद ढोके यांनी विविध विभागाचा आढावा घेतला़ कार्यक्रमास आमदार शिवाजी कर्डिले, आमदार प्रकाश गजभिये, भास्करराव पाटील, नाथाजी चौगुले, पंकजकुमार महाले़, सुनीता पाटील, विजयकुमार ठोंबरे आदी उपस्थित होते़ सूत्रसंचालन बापूसाहेब भाकरे यांनी केले़ डॉ़ पंडीत खर्डे यांनी आभार मानले.प्रत्येक विद्यापीठाने दहा गावे दत्तक घ्यावीत..राज्यातील चारही विद्यापीठांनी प्रत्येकी दहा गावे दत्तक घेऊन शेतकरी, पदवीधर शेतकºयांच्या माध्यमातून बदल घडवून आणावा, असे आवाहनही यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर