शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

१५ दिवसापासून कर्जुलेहर्या परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंज-यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:54 IST

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ रोडवरील कमळजादेवी वस्ती परिसरात बिबट्याचा १५ दिवसापासून मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या अगोदर बिबट्याला पकडणासाठी पिंजरा लावला होता.

टाकळी ढोकेश्वर : कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ रोडवरील कमळजादेवी वस्ती परिसरात बिबट्याचा १५ दिवसापासून मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी व रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या अगोदर बिबट्याला पकडणासाठी पिंजरा लावला होता. परंतु पिंज-यात भक्ष्य नसल्यामुळे हा पिंजरा फक्त शोभेची वस्तू आहे का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला होता. अखेर मंगळवारी रात्री वनविभागाला यश आले असून बिबट्या अखेर पिंज-यात कैद झाला.कर्जुले हर्या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याने मांडओहळ धरण परिसरातील कमळजादेवी येथे निवृत्ती भागाजी आंधळे, दत्तू कारभारी शिंदे, सुदाम मारुती आंधळे, शरद बन्सी उंडे यांच्या घराजवळील शेतामध्ये वास्तव्य केले होते. त्यामुळे शेतकरी शेतात रात्री बेरात्री पाणी भरण्यासाठी जाण्यास घाबरत असत. तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी शाळेत जाताना मुठीत जीव घेऊन प्रवास करीत होते. गेल्या पंधरा दिवसात परिसरातील वस्त्यांवरील सर्व कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता.मंगळवारी दुपारी शरद बन्सी उंडे यांच्या घरासमोरील उसाच्या शेतात बिबट्या दिसल्यानंतर टाकळीढोकेश्वर येथील वनविभागाचे वनरक्षक दिनकर मुरूमकर यांना दूरध्वनीवरुन कल्पना दिली. त्यानंतर सर्व वन कर्मचा-यांनी पिंजरा घेऊन कमळजादेवी वस्तीवर जाऊन पिंजरा लावण्यात आला. मंगळवारी रात्री काही काळानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्या थोडा आजारी असल्यामुळे त्याला जुन्नर येथील उपचार व निवारा केंद्रात हलविण्यात आले. यावेळी उपवन संरक्षण अधिकारी ए.लक्ष्मी, वनक्षेत्रपाल किसान आगलावे, संजय कडू उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर