शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

१४ शिक्षकांचा जिल्हा पुरस्काराने गौरव

By admin | Updated: September 5, 2014 23:48 IST

अहमदनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यात १४ तालुक्यातून एक अशा १४ शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला.

अहमदनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यात १४ तालुक्यातून एक अशा १४ शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणला असल्याची माहिती दिली.शेंडी येथील एका सांस्कृतिक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा कार्यक्रमाला सुरूवात झाली.कार्यक्रमाला अध्यक्ष लंघे, उपाध्यक्षा मोनिका राजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सभापती कैलास वाकचौरे, हर्षदा काकडे, शाहुराव घुटे, राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, शरद नवले, आझाद ठुबे, बाजीराव गवारे, अश्विनी भालदंड, सुरेखा भोसले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुभाष लांडे आदी उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष लंघे म्हणाले की, गेल्या वर्षी केंद्रप्रमुखांनाही पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची वचनपूर्तता यंदा करण्यात आली आहे. पूर्वी जिल्हा पुरस्कारासाठी सदस्यांच्या सूचनेवरून शिक्षकांची निवड करण्यात येत होती. मात्र, पाच वर्षापासून गुणवत्तेवर या शिक्षकांची निवड करण्यात येत आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांना खासगी शाळांशी स्पर्धा करावी लागत आहे. सेमी इंग्रजी शाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली असे लंघे यांनी सांगितले. उपाध्यक्षा राजळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाने वस्ती शाळा शिक्षक, साधन व्यक्ती यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याच धर्तीवर प्रशासनाने नियमाची पूर्तता करून आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेतून सातत्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभापती काकडे, सदस्य घुले, पुरस्कार प्राप्त संतोष मगर, तुकाराम कातोरे, उपशिक्षणाधिकारी पोपट काळे यांची भाषणे यावेळी झाली. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले.कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी शिवाजी कराड, रमजान पठाण यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)शिक्षक दिन संकल्प दिन ठरावामुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी शिक्षक दिन हा शिक्षकांचा संकल्प दिन ठरावा, जिल्हा प्रशासन शिक्षकांचे प्रश्न सोडवित असून पदाधिकारी आणि सदस्य राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाला मदत करत आहेत. जिल्हा परिषदेची प्रतिष्ठा जिल्हा परिषदेच्या शाळेवर अवलंबून असल्याने शिक्षकांनी योग्य काम करावेत. काही अडचणी असतील मात्र, त्याचा बाऊ करून काम टाळणे चुकीचे आहे. ज्या ठिकाणी योग्य काम होणार नाही, त्या ठिकाणी कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा नवाल यांनी दिला.भाऊसाहेब कासार (अकोले), सुदाम दाते (संगमनेर), बाबासाहेब महानुभव (कोपरगाव), अरूण बनसोडे (राहाता), चंदा गायकवाड (श्रीरामपूर), मारूती आग्रे (राहुरी), अशोक झावरे (नेवासा), श्रीकांता शिंदे (शेवगाव), संजीवनी दौडे (पाथर्डी), केशव हराळे (जामखेड), दत्तात्रय अटकरे (कर्जत), शिवाजी कुलांगे (श्रीगोंदा), संतोष मगर (पारनेर), मीना जाधव (नगर) यांचा समावेश आहे. केंद्रप्रमुख तुकाराम कातोरे (नगर), वि.नी. कोल्हे (नेवासा) आणि राजेंद्र ढाकणे ( शेवगाव) यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.