शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीतून क्वारंटाईन केलेल्या १४ जणांनी ठोकली धूम; गुन्हा दाखल : बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 13:25 IST

एकीकडे कोरोनाची लढाई प्रशासन लढत आहे. दुसरीकडे मात्र क्वारंटाईन केलेल्या दोन कुटुंबातील तब्बल १४  सदस्यांनी धूम ठोकल्याची घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाचा समावेश आहे. 

 राहुरी : एकीकडे कोरोनाची लढाई प्रशासन लढत आहे. दुसरीकडे मात्र क्वारंटाईन केलेल्या दोन कुटुंबातील तब्बल १४  सदस्यांनी धूम ठोकल्याची घटना राहुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाचा समावेश आहे.  राहुरी तालुक्यात दोन ठिकाणी या घडल्या आहेत.  दोन्ही घटना मंगळवारी (दि.१९ मे) सकाळी उघडकीस आल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तालुक्यातील केंदळ खुर्द येथे क्वारंटाईन केलेले एक जोडपे दुस-याची मोटारसायकल घेऊन आपल्या दोन लहान मुलामुलींसह पळून गेले आहे. तर दुसºया घटनेत संत गाडगेबाबा आश्रमात क्वारंटाईन केलेल्या बीडच्या एका कुटुंबाने धूम ठोकली. दोन्ही घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.१५ मे रोजी केंदळ खुर्द येथील सेंट जोसेफ विद्यालय येथील शाळेत काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यात एका आदिवासी जोडप्याचा समावेश होता. ते जोडपे आपल्या दोन मुलांसह आले होते. हे क्वारंटाईन केलेले जोडपे दोन मुलामुलींसह अचानक गायब झाले. मित्रांची मोटरसायकल घेऊन ते पळून गेले असल्याचे तेथे ड्युटीवर असलेल्या शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी सदर घटना गाव समितीला तत्काळ सांगितली. बीड जिल्ह्यातून आलेले एक कुटुंब राहुरी येथे संत गाडगे महाराज आश्रम शाळेत १७ मे रोजी क्वारंटाईन करण्यात आले होते. सदर कुटुंबात आठ ते दहा सदस्य होते. ते कुटुंब  मंगळवारी रात्री कोणाची पूर्व परवानगी न घेता निघून गेली. राहुरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  त्यात १४ महिन्यांची लहान मुले देखील होती.‘त्या’ दोन कुटुंबांचा शोध सुरू बाहेरगावावरून कोणी आल्यास त्याची प्रशासनाकडून तसेच गावपातळीवर योग्य ती दखल घेतली जाते. त्यांना क्वारंटाईन केले जाते. त्यांची सर्व व्यवस्था केली जाते. असे असताना हे नवीन जोडपे पळून गेलेच कसे? असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे. सदर जोडपे कुठे गेले? याबाबत शोधाशोध करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र बुधवारी सकाळपर्यंत या जोडप्यांचा थांगपत्ता लागला नाही, असे सांगण्यात आले. तहसीलदार फसिउद्दीन शेख यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांनी या जोडप्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याRahuriराहुरीPoliceपोलिस