अहमदनगर : बनावट खरेदीखताद्वारे व्यवहार करत ग्राहकांची १४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ याप्रकरणी सूर्यकांत रावसाहेब कोल्हे (५०) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अजित कृष्णराव कदम (३९), संजय रत्नाकर झिंजे (६०) गिरीश सुभाष गायकवाड (३७) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़१७ जुलै रोजी झिंजे व गायकवाड यांच्या मध्यस्थीने कोल्हे यांनी कदम याच्याकडून सावेडी येथील एक फ्लॅट खरेदी केला़ या फ्लॅटचे खरेदीखत करताना कोल्हे याने कामगार तलाठी यांचा जुना उतारा वापरून बनावट खरेदीखत तयार केले़ याप्रकरणी कोल्हे यांनी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशांवरून गुन्हा दाखल झाला़
खरेदीखताद्वारे १४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 03:33 IST