शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३६ शाळा आऊट आॅफ रेंज; आॅनलाईन प्रशासनाचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:08 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आॅनलाईनची सक्ती केली जात असली तरी जिल्ह्यातील १३६ शाळा ‘आऊट आॅफ रेंज’ असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहेत. 

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आॅनलाईनची सक्ती केली जात असली तरी जिल्ह्यातील १३६ शाळा ‘आऊट आॅफ रेंज’ असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहेत. शाळा परिसरात नेट सुविधाच नसल्याने सरलसह विविध अहवाल पाठविण्यासाठी शिक्षकांना अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे.सन २०११ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचे गुगल मॅपिंग करण्यात आले़ शाळा आॅनलाईनच्या कक्षेत आल्याने शासनाने शाळांची सर्व माहिती आॅनलाईन देणे शिक्षकांना बंधनकारक केले. शाळेतील मुलांना पुरविला जाणारा पोषण आहार, पटसंख्या, शिक्षकांची संख्या, पायाभूत सुविधा, शिक्षण खात्याचे आदेश, बैठका व प्रशिक्षणांचे निरोप देणे, यासारखी कामे आॅनलाईन झाली. शाळांचे अहवाल आॅनलाईन पाठविण्यात येत असल्याचा दावा शिक्षण खात्याकडून करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील १३६ शाळांमध्ये आजही नेट उपलब्ध नाही. अकोले तालुक्यातील सर्वाधिक ५९ शाळांमध्ये रेंज नसल्याने गुगल मॅपिंग झालेले नाही. शाळा परिसरात रेंजच नसल्याने कोणतीही माहिती शिक्षकांना आॅनलाईन देणे शक्य होत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.शासनाने व्हॉटसअप प्रशासन सुरू केले. परंतु, शाळांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. सुविधा न देता शिक्षकांवर आॅनलाईनची कामे लादण्यात आली आहेत. काही शाळांमध्ये रेंज आहे़ परंतु, स्वतंत्र संगणक किंवा लॅपटॉप नाही. यावर कळस असा की काही शाळांना अद्याप वीज जोड नाही. वीज जोडणी झालेल्या शाळांतील वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे खंडित करण्यात आलेला आहे. मध्यंतरी शिक्षकांनी पदरमोड करून सेतू केंद्रातून ही माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावर सरकारने बंदी घातली असून, शिक्षकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. रेंज नसल्याने काहींना बैठक, प्रशिक्षण माहिती पाठवा, यासारखे निरोप मिळत नाहीत. त्यामुळे माहिती पाठविण्यास विलंब होतो. माहिती वेळेत न आल्यास संबंधित शिक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रकार घडले असून, रेंज नसल्याने आॅनलाईन कारभारात सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर उपाय योजना करण्याबाबतही सरकार उदासीन असल्याने हा गोंधळ आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचे दिसते.

रेंज नसलेल्या शाळा

अकोले-५९, जामखेड-२०, कर्जत-३, नगर-३, नेवासे-३, पारनेर-३ पाथर्डी-५, राहाता-१५, संगमनेर-२, शेवगाव-१९, श्रीरामपूर-३

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा