शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, वीज, रस्त्यासाठी शेवगाव नगरपरिषदेच्या १२ नगरसेवकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:38 IST

नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षांसह सर्वपक्षीय १२ नगरसेवकांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात दिवसभर बेमुदत उपोषण आंदोलन करून या विषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

शेवगाव : शेवगाव नगरपरिषदेच्या घंटागाड्यासह इतर सर्व वाहने बंद असल्याने कचरा कोंडी निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याची समस्या बिकट बनली आहे. पिण्याचे पाणी,वीज, अंतर्गत रस्ते, सांडपाण्याचे निर्मुलन आदी समस्यांची तीव्रता वाढत चालल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे.याबाबत संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षांसह सर्वपक्षीय १२ नगरसेवकांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात दिवसभर बेमुदत उपोषण आंदोलन करून या विषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.शेवगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या घंटा गाड्या, ४०७ टेम्पो जेसीबी आदी वाहने गेल्या अनेक दिवसापासून नादुरस्त असल्याने शहरात कचरा निर्मूलनाची समस्या उभी ठाकली आहे. विविध प्रभागात कचरा व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या बिकट बनली आहे. शहराच्या विविध परिसरातील विद्युत खांबावरील वीज पुरवठा बंद असल्याने तसेच विजेचे पथदिवे, हायमॅक्स बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असून चोरी मारीच्या घटनामध्ये बेसुमार वाढ झाल्याच्या तक्रारी आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या वोलची दुरुस्ती व पाण्याची गळती सुरु असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करताना नाकी नऊ आले आहे. बाजार तळावरील भाजी मंडईचे काम पूर्ण होऊन कालावधी लोटला, मात्र ही इमारत नगरपरिषदेच्या ताब्यात नसल्याने आठवडे बाजारासाठी येणा-या विक्रेते व नागरिकांना गैरसोय सहन करण्याची वेळ आली आहे. एकंदरीत नगरपरिषदेच्या कामकाजावर मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांचे नियंत्रण नसल्याने अनागोंदी कारभार वाढल्याच्या तक्रारीवरून हे उपोषण आंदोलन पुकारण्यात आले होते. नगरसेवक अरुण मुंढे, सागर फडके, वजीर पठाण, शब्बीर शेख, अजय भारस्कर, विकास फलके, कृष्णा ढोरकुले, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, भाऊसाहेब लिंगे, विनायक मोहिते, नितीन दहिवाळकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. माजी सरपंच सतीश लांडे, एजाज काझी, हरिश भारदे, राहुल मगरे, मच्छिंद्र देहाडराय, विक्रांत लांडे, बाळासाहेब गायकवाड, अविनाश देशमुख आदींनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव