शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

११७ कारखाने अडचणीत

By admin | Updated: August 8, 2016 00:11 IST

अण्णा नवथर, अहमदनगर अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) बेकायदेशीर वाटप झालेले १६८ भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे़

अण्णा नवथर, अहमदनगरअहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) बेकायदेशीर वाटप झालेले १६८ भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे़ त्यामुळे ११७ उद्योग अडचणीत आले असून, सुमारे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे़नगरच्या औद्योगिक वसाहतीत आधीच उद्योजकांचा दुष्काळ आहे़ पायघड्या घालूनही इथे उद्योग सुरू करण्यास कुणी मोठा उद्योजक येण्यास तयार नाही़ त्यामुळे रोजगार निर्मिती शून्य़ शिक्षण घेऊन मुले नोकरीसाठी इतर जिल्ह्यांची वाट धरतात़ नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत एकही मोठा कारखाना आला नाही़ जे छोठे -मोठे कारखाने सुरू आहेत, त्या उद्योजकांमागेही कोर्टाचे झिंगाट लागले आहे़ हे पाप नेमके कुणाचे, ते चौकशीअंती समोर येईलच़ परंतु त्याचा नगरच्या उद्योगक्षेत्राला मोठा फटका बसला आहे़ आतापर्यंत १२७ उद्योजकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत़ याचाच अर्थ सध्या सुरू असलेल्या ११७ कारखान्यांचे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे़ कारखानदारांचे न्यायालयाचे दरवाजे आता बंद झाले आहेत़ त्यामुळे ज्यावेळी प्रशासनाकडून लिलाव जाहीर होईल, त्यावेळी बोली लावणे, हा एकमेव पर्याय उद्योजकांसमोर आहे़ त्यामुळे उद्योजकांचे मनोधैर्य खचले असून, यावर उपाय काय, याचा शोध घेण्यासाठी त्यांची धावपळ सध्या सुरू आहे़ वसाहतीतील ११७ कारखानदारांना नोटिसा बजावल्या आहेत़ त्यात आणखी वाढ होऊ शकते़ नोटिसा बजावलेल्या कारखान्यांत कार्यरत असलेले कामगार चिंताग्रस्त झाले आहेत. आधीच नोकऱ्या नाहीत़ त्यात न्यायालयाच्या निर्णयामुळे ३ हजार कायम आणि दीड हजार कंत्राटी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यात मंदीने आधीच उद्योजक त्रस्त आहेत़ बहुतांश कारखाने रात्रंदिवस चालत होते़ ते आता एकाच सत्रात चालविले जात आहेत़ मंदीचा रोजगारावर परिणाम झाला असून, न्यायालयाच्या या निर्णयामुळे तर कसेबसे नोकरी टिकवून असणाऱ्या कामगारांचा प्रश्न गंभीर बनला आहे़ कामगारांनीही एक याचिका दाखल केली होती़ पण ती न्यायालयाने फेटाळली़ त्यामुळे उद्योजकांबरोबरच कामगारांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे़ सरकारच्या भूमिकेकडे कामगारांचे लक्षभूखंडांचे वाटप प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ ही सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली़ याचिकाही बेकायदेशीर वाटपाबाबत आहे़ त्यात उद्योजकांची चूक नाही़ परंतु उद्योजकांनी पुढाकार घेऊन याचिका दाखल केली़ त्यावर न्यायालयाने निर्णय दिला़ या निर्णयामुळे भूखंड ताब्यात घेण्यात येणार असून, हा निर्णय राज्यभर लागू झाला आहे़ त्यामुळे इतर जिल्ह्यात असे प्रकार समोर येण्याची शक्यता असून,याबाबत सरकार काय भूमिका घेते,याकडे उद्योजक व कामगारांच्या नजरा आहेत़ कारखान्यांत काम करणारे कामगार आजूबाजूच्या गावातीलच आहेत़ भूखंड ताब्यात घेतल्यास कामगारांच्या हाताला काम मिळणार नाही़ त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे़ कायदेशीर लढाई संपली असून, आता भिस्त राजकर्त्यांवरच आहे़ ते काय भूमिका घेतात, त्यावरच या कारखान्यांचे भवितव्य अवलंबून आहे़-मिलिंद कुलकर्णी,सचिव, आमी संघटनान्यायालयाच्या या निर्णयामुळे नगरच्या उद्योगाववर अत्यंत वाईट परिणाम झाले आहेत़ उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, उद्योजक सैरभैर झाले आहेत़ उद्योगांवर अवलंबून असणारे कामगार व छोटे उद्योजकही यामुळे अडचणीत आले आहेत़-कारभारी भिंगारे, उद्योजकप्रशासनाकडून भूखंडांचे वाटप झालेले आहे़ वास्तविक पाहता औद्योगिक विकास महामंडळाने न्यायालयात याचिका दाखल करणे आवश्यक होते़ मात्र प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही़ कदाचित प्रशासनाने बाजू मांडली असती तर निकाल वेगळा लागला असता़ कायदेशीर लढाई संपली असून, आता उद्योजक व कामगारांची भिस्त राज्यकर्त्यांवरच आहे़-अशोक सोनवणे,अध्यक्ष आमी संघटनान्यायालयाने दिलेला निर्णय योग्यच आहे़ कामगारांवर वाईट दिवस येणार आले आहेत़ कारखाने बंद झाल्यास कामगारांच्या हाताला काम राहणार नाही़ सरकारने कामगारांबाबत योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे़ कुठलीही चूक नसताना कामगार यात भरडले जाणार असून, त्यांच्यासाठी योग्य ती भूमिका घेणे गरजेचे आहे़ -योगेश गलांडे,अध्यक्ष स्वराज्य कामगार संघटनासरकारने उद्योजकांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडणे आवश्यक होते़ त्यादृष्टीने प्रयत्नही झाले़ मात्र सरकारने याकडे कानाडोळा केला़ त्यामुळे उद्योजकांवर अन्याय झाला़ सरकारची भूमिका चुकीची आहे़ त्याचा उद्योजक आणि कामगार, दोघांनाही फटका बसेल़ कामगारांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल़-अभिजित लुणिया, जिल्हाध्यक्ष, इंटक