शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी १०७ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:36 IST

अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्यासाठी १०७ जणांनी महापालिकेच्या नगररचना विभागात प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ३ हॉस्पिटलांसह १४ जणांनी दोन ते तीन कोटींचा दंड भरून अनधिकृत बांधकामे नियमित करून घेतली आहेत. अन्य प्रकरणांबाबत छाननी सुरू आहे. दरम्यान अनधिकृत हॉस्पिटलची बांधकामे नियमित करून घेण्याकडे डॉक्टरांनीही पाठ फिरवली आहे.

अहमदनगर : अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्यासाठी १०७ जणांनी महापालिकेच्या नगररचना विभागात प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ३ हॉस्पिटलांसह १४ जणांनी दोन ते तीन कोटींचा दंड भरून अनधिकृत बांधकामे नियमित करून घेतली आहेत. अन्य प्रकरणांबाबत छाननी सुरू आहे. दरम्यान अनधिकृत हॉस्पिटलची बांधकामे नियमित करून घेण्याकडे डॉक्टरांनीही पाठ फिरवली आहे.शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सहा-सात महिन्यांपूर्वी राबविण्यात आली होती. त्यामध्ये शहरातील १०७ हॉस्पिटलांचे बांधकाम अनधिकृत असल्याचे आढळून आले होते. अनेकांची बांधकामे अनियमित होती, तर अनेकांनी पार्किंगमध्ये औषधी दुकाने, क्लिनिक, डॉक्टरांच्या ओपीडीचे बांधकाम केले होते. हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम शहरात राबविण्यात आली. त्यावेळी १०७ पैकी ५४ हॉस्पिटलांची बांधकामे पाडण्यात आली. ही कारवाई सुरू असताना काही डॉक्टरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सध्या सुनावणी प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान राज्य शासनाने एका आदेशाद्वारे (अनधिकृत बांधकामे नियमित करणे अधिनियम ५२-क)अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करून घेण्याचा आदेश दिला. त्यावर महापालिकेच्या नगररचना विभागाने या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नव्या आदेशाप्रमाणे ६६ जणांनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. याशिवाय पूर्वीच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ४१ जणांचे प्रस्ताव आहेत. त्यापैकी १४ जणांची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात आली आहेत. त्यापोटी महापालिकेला २ ते ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. १४ पैकी ११ जणांमध्ये सामान्य बांधकामे आहेत, तर ३ जणांनी हॉस्पिटलांची अनधिकृत बांधकामे नियमित केली आहेत. शहरातील अन्य अनधिकृत बांधकामांबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.पार्किंगमुक्त चौक २६ जुलैपासूनशहरातील नऊ चौक पार्किंगमुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्याचे जाहीर करण्यात आले होते. याशिवाय पे अ‍ॅण्ड पार्कसाठी जागाही सूचविण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. पूर्वीच्या मुदतीत अवघी एक हरकत आली होती. त्यामुळे हरकती देण्यासाठी पुन्हा १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता योजनेची २६ जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सहायक नगररचना संचालक संतोष धोंगडे यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका