शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यमुक्तीस नकारघंटा : जिल्हा परिषदेचे १०कर्मचा-यांवर ‘विशेष प्रेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 10:20 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही दहा कर्मचाºयांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही़

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊनही दहा कर्मचाºयांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही़ या कर्मचाºयांवर अधिकाºयांच्या विशेष प्रेमाचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ तर काही ठिकाणी कागदोपत्रीच कर्मचाºयांची बदली झाली आहे़ वास्तविक हे कर्मचारी पूर्वीच्याच ठिकाणी काम करीत आहे़ हे सर्व खुलेआम सुरु असताना मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने कारवाई करण्यास तयार नाहीत़जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची बदली झाल्यानंतर त्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर झाले पाहिजे़ जे प्रामाणिक काम करणारे कर्मचारी होते, ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले़ त्यातही काही कर्मचाºयांना मनाप्रमाणे तर काही कर्मचाºयांना दुजाभावाने बदल्या दिल्या़ त्यातून कर्मचाºयांची नाराजी असली तरी त्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास प्रथम प्राधान्य दिले़ मात्र, विशिष्ट कर्मचाºयांवर अधिकाºयांचे ‘विशेष प्रेम’ असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही़ असे दहा कर्मचारी अधिकाºयांच्या ‘विशेष प्रेमा’चे लाभार्थी झाले आहेत़सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी विभाग प्रमुखांना पत्र पाठवून बदली झालेल्या कर्मचाºयांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे, अशा सूचना दिल्या़ तसेच बदल्या झालेले किती कर्मचारी हजर झाले, याबाबतचा अहवालही मागितला होता़ हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाला असून, त्यात दहा कर्मचाºयांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे़ बदली झाल्यानंतर काही कर्मचाºयांनी बदलीच्या ठिकाणी हजर होऊन सही केली़ मात्र, पुन्हा वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने पुन्हा पहिल्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत़ अशा कर्मचाºयांवर प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ तोंडी आदेशावर विभागप्रमुख आपल्या लाडक्या कर्मचाºयांची ‘सोय’ करीत असतील तर बदल्यांचे ढोंग का केले जाते, असा सवालही जिल्हा परिषदेत दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे़किती कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले, याची माहिती मागितली होती़ ही माहिती प्राप्त झाली असून, केवळ १० कर्मचारी अद्याप बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत़ त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केलेले नाही़ -वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा़प्ऱवि़)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद