शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

झेन कथा - तुम्हाला काय ‘हवे’ आहे? डायोजेनीस म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 01:33 IST

अलेक्झान्डर म्हणाला, ‘मी ठीक आहे, पण मला तुमच्यासारख्या महान ज्ञानी संताला मदत करावीशी वाटते. माझ्याकडे सर्वसत्ता आणि संपत्ती आहे. तुम्ही जे मागाल ते मी आत्ताच्या आता देऊ शकतो

धनंजय जोशी

प्रत्येक क्षणी आपल्याला काहीना काहीतरी हवे असते. आपण ज्या गोष्टींचा हव्यास किंवा पाठपुरावा करतो त्यांचे खरे स्वरूप आपल्याला समजले तर तो हव्यास आपोआप संपतो. आपले दैनंदिन जीवन अगदी साधे आणि सोपे होऊन जाते. याबद्दल सान सा निम एक गोष्ट सांगायचे. पूर्वी ग्रीसमध्ये अथेन्स शहरामध्ये डायोजेनीस नावाचा मोठा संत होऊन गेला. डायोजेनीस मोठा ज्ञानी होता, पण अगदी निरीच्छपणे राहत असे. रस्त्यावर झोपायचा. कधी कपडे घालायचा, तर कधी नाही. साधे आणि कशाचा हव्यास न बाळगणारे जीवन ही त्याची शिकवण. एकदा तो असाच झोपला असताना त्याला जरा थंडी वाजून जाग आली. त्याने डोळे उघडून बघितले तर त्याच्या पुढे उभा होता अलेक्झान्डर द ग्रेट! अलेक्झान्डर अत्यंत शक्तिशाली राजा होता. तो डायोजेनीसकडून शिकवण घेण्यासाठी आला होता. डायोजेनीस त्याच्याकडे बघून म्हणाला, ‘ओ अलेक्झान्डर द ग्रेट? कसे आहात आपण ?’

अलेक्झान्डर म्हणाला, ‘मी ठीक आहे, पण मला तुमच्यासारख्या महान ज्ञानी संताला मदत करावीशी वाटते. माझ्याकडे सर्वसत्ता आणि संपत्ती आहे. तुम्ही जे मागाल ते मी आत्ताच्या आता देऊ शकतो. जमीन, पैसा , सोने, चांदी तुम्हाला जे काय हवे ते तुम्ही फक्त मागायचे. एका क्षणार्धात मी ते तुमच्यासमोर सादर करेन. सांगा, तुम्हाला काय पाहिजे?’ डायोजेनीस म्हणाला, ‘तुम्ही मला मदत करू शकता? थँक यू सो मच !’- अलेक्झान्डरने विचारले, ‘सांगा, काय हवे तुम्हाला?’ डायोजेनीस म्हणाला, ‘अलेक्झान्डर द ग्रेट, तुम्ही माझ्या आणि उन्हाच्या मध्ये उभे आहात, मला थंडी वाजते, जरा बाजूला व्हाल का? ’त्याची माफी मागत अलेक्झान्डर पटकन बाजूला झाला. डायोजेनीस हसून म्हणाला, ‘थँक यू , थँक यू. मला तुमच्याकडून तेवढेच पाहिजे होते.’इतकी छोटी गोष्ट, पण खूप शिकवून जाते. डायोजेनीसला सोन्या-चांदीमधली शून्यता समजली होती. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक