शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

झेन कथा - हे असं आहे काय?, बरं!

By योगेश मेहेंदळे | Updated: November 17, 2017 16:39 IST

झेन गुरू हाकुईन यांचं नाव आसपासच्या प्रदेशात अत्यंत सन्मानानं घेतलं जाई. शुद्ध चारीत्र्याचा दाखला म्हणून हाकुईन यांच्याकडे लोक पाहत असत. शेजारी पाजारी, त्या प्रांतातले सृलहान थोर असे सगळेच जण हाकुईन यांच्या सत्वशील राहणीचे चाहते होते.

ठळक मुद्देतिच्या पालकांनी तिला खडसावत विचारलं, तुझ्या पोटातल्या बाळाचा पिता कोण आहे? हाकुईनमुळे आपल्या मुलीला दिवस गेल्याचे समजल्यावर तर त्यांचा राग अनावर झालासगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर हाकुईन यांनी फक्त इतकंच म्हटलं... हे असं आहे काय?, बरं!

झेन गुरू हाकुईन यांचं नाव आसपासच्या प्रदेशात अत्यंत सन्मानानं घेतलं जाई. शुद्ध चारीत्र्याचा दाखला म्हणून हाकुईन यांच्याकडे लोक पाहत असत. शेजारी पाजारी, त्या प्रांतातले सृलहान थोर असे सगळेच जण हाकुईन यांच्या सत्वशील राहणीचे चाहते होते.

त्यांच्या मठाजवळच एक सुंदर मुलगी राहत होती. तिच्या वडिलांचं खाद्य पदार्थ विक्रीचं दुकान होतं. एके दिवशी अचानक पालकांच्या लक्षात आलं की, त्यांच्या मुलीला दिवस गेले आहेत. प्रचंड संतापलेल्या तिच्या पालकांनी तिला खडसावत विचारलं, तुझ्या पोटातल्या बाळाचा पिता कोण आहे? ती आधी तोंड उघडायला तयार नव्हती. अखेर पालकांनी खूपच दटावणी केल्यानंतर तिनं तोंड उघडलं आणि सांगितलं की हाकुईन तिच्या पोटातील बाळाचा पिता आहे. ज्याच्या शुद्ध चारीत्र्याचे गोडवे गायले जातात, तो हाकुईनमुळे आपल्या मुलीला दिवस गेल्याचे समजल्यावर तर त्यांचा राग अनावर झाला. ते संतापलेल्या अवस्थेत तसेच हाकुईनकडे गेले आणि त्यांनी हाकुईनना ही घटना सांगत जाब विचारला. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर हाकुईन यांनी फक्त इतकंच म्हटलं... हे असं आहे काय?, बरं!

मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाला हाकुईन यांच्याकडे आणण्यात आलं. हाकुईन यांची सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. मानमरातब गेला होता, कुणीही विचारत नाही अशी स्थिती झाली होती. तरीही दैनंदिन आचार विचारात कुठलाही फरक न पडलेल्या हाकुईन यांनी बाळाची चांगली काळजी घेतली. बाळाच्या पालनपोषणासाठी जे काही लागतं ते हाकुईन यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आणली आणि त्याची चांगली काळजी घ्यायला सुरूवात केली.

असंच वर्ष निघून गेलं. त्या मुलीला हा प्रकार सहन होईना. तिनं अखेर पालकांना सत्य सांगितलं की तिच्या बाळाचा पिता हाकुईन नसून दुसराच एक तरूण आहे, जो मच्छीबाजारात काम करतो. हे कळल्यावर शरमिंदे झालेले त्या मुलीचे आई वडील पुन्हा हाकुईनकडे गेले. त्यांच्या पाया पडून माफी मागितली आणि बाळाला पुन्हा नेत असल्याचं सांगितलं.

बाळाची काळजी घेत असलेल्या हाकुईन यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले...हे असं आहे काय?, बरं!

टॅग्स :Zenझेनspiritualअध्यात्मिक