शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आपल्यामुळे दुसऱ्यांचे जीवन धन्य व्हायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 21:38 IST

मनुष्य जीवन हे आनंददायी आहे. मनुष्य देह हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे. शरीर माद्यम खलुधर्म साधनम्... अशा स्वरूपाचा जीवनाचा साकल्याने विचार केला आहे. आपल्या संस्कृतीत नकारात्मक भूमिका मांडण्याची पद्धत रूढ झाली आहे. 

-चंद्रकांत महाराज वांजळे

मनुष्य जीवन हे आनंददायी आहे. मनुष्य देह हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे. शरीर माद्यम खलुधर्म साधनम्... अशा स्वरूपाचा जीवनाचा साकल्याने विचार केला आहे. आपल्या संस्कृतीत नकारात्मक भूमिका मांडण्याची पद्धत रूढ झाली आहे. जीवन आणि शरीर याविषयी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज एकाठिकाणी सुंदर विचार मांडतात, ‘शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरा साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रम्ह...’’ एवढी मोठी गुणवत्ता मनुष्य शरीरामध्ये आहे. त्याच अनुषंगाने मनुष्य अनेक इती कर्तव्ये पूर्ण करतो. यात फार मोठी अद्भुतता आहे. जीवन हे चंगळवादी आणि भोगवादी असेल, बंदिस्त झालेले असेल, तर ही हानी संत महात्मे पाहू शकत नाहीत. म्हणून अशा स्वरूपाच्या समाज जीवनाकडे पाहताना ‘बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनिया...’, अशा स्वरूपाचे उद्गार मुखाविरंदातून बाहेर पडतात. त्यासाठी महात्मे कृतिशील राहतात.

 स्वत:चे जीवन समाजासाठी खर्ची करत असतात. आपलाच एक आदर्श निर्माण करीत असतात. संतश्रेष्ठ तुकोबाराय प्रतिज्ञेने सांगतात की, ‘धन्य म्हणविले इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला...’’ मी असा एक जगेन की मला ज्या लोकांनी पाहिलेय ते म्हणतील आम्ही धन्य आहोत. अगदी महात्मा गांधीजींना सुद्धा विचारले होते की, ‘‘आपण एखादा संदेश द्या, त्यांवर गांधीजींनी माय लाईफ इज माय मॅसेज, माझे जीवनच माझा संदेश, आहे असे म्हटले होते. ही अहंकाराची भावना नाही. आपल्या जीवनावर असणारी श्रद्धा, विश्वास आहे. त्याचे हे प्रतीक आहे. तुकोबारायांनी म्हणावे की मी अशा पद्धतीने जगेन की ज्यांनी मला पाहिलेय ते मला धन्य म्हणतील. आणि योगायोग अशा स्वरूपाचा आहे की तुकोबारायांना ज्यांनी पाहिले. तुकोबारायांचा ज्यांचाशी व्यवहार आला ते रामेश्वर भट्टही म्हणाले की, ‘धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, तुकाराम-तुकाराम नाम घेता कापे यम....’’सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा की ही माणसे स्वत:चे जीवन अशा पद्धतीने जगली, की त्यांच्यामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. त्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्यांचे जीवन धन्य होईल, असे आचार, विचार असावेत. आपले जीवन दुसऱ्यांना प्रेरक ठरावेत. त्यातून माणसाचा विकास होणार आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड