शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

शब्द हे मनाचे आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:40 IST

व्यक्तीचे सुप्त मन सुखावते ते फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी.

शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. व्यक्तीचे संवाद साधण्याचे साधन म्हणजे शब्द.  शब्द व्यक्तीला कधी सुखावतात तर कधी दुखावतात. शब्दांनीच मन जुळते तर कधी आयुष्यभरासाठी दुरावते. शब्दचं मनाला भुरळ घालतात आणि गुंतवतात प्रेमाच्या नात्यांमध्ये. शब्द आणि मन यांचे जवळचे नाते आहे. दोन शब्द प्रेमाचे ऐकले की; मन प्रसन्न आणि उत्साहित होते. हेच दोन शब्द मन दुखावणारे असतील तर आयुष्यभर मन खट्टू राहते. इतके मन आणि शब्दांचे अतुट नाते आहे. अक्षरांपासून शब्द तयार होतात. शब्दांचे वाक्य आणि वाक्यांचा परिश्छेद. तसे बघितल्यास दोन व्यक्तिंमध्ये चांगल्या शब्दांचा संवाद असल्यास दोघेही एकमेकांच्या मनाची काळजी आयुष्यभर घेतात. आपल्याकडे लग्न जमवतांना पत्रिका बघतात. मुलाचे आणि मुलीचे छत्तीस गुण जुळणे हे भाग्याचे लक्षण समजले जाते. असे मानले जाते की छत्तीस गुण जुळणारे जोडपे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात, एकमेकांच्या शब्दांचा आदर ठेवतात ते पाळतात. पण हे छत्तीस गुण जुळणे म्हणजे नेमके काय ? 

आपल्या मराठी भाषेमध्ये १२ स्वर आणि ३४ व्यंजने आहेत. ‘ क्ष ’ आणि ‘ ज्ञ ’ मिळून ही वर्णमाला ४८ वर्णांची होते. यातील ३४ व्यंजने आणि ‘ क्ष ’ आणि ‘ ज्ञ ’ मिळून छत्तीस अक्षरे होतात. या अक्षरांपासून शब्द तयार होतो. शब्दांपासून तयार झालेली ही वाक्य ज्या प्रमाणात जुळतात तितके गुण जुळले असे तर नाही ना ? हे ३६ गुण म्हणजे ३६ अक्षरांपासून तयार होणारे शब्द आणि वाक्य, एकमेकांचे किती मन सांभाळतील असेच ना !  शब्द आधार असतात व्यक्तीच्या मनाचे. ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आपल्या मनाला आधार असल्या सारखे वाटते त्या व्यक्ती सोबत तासंतास बोलत रहावेसे वाटते. मन हे फार चंचल असते. त्याला आवर घालणे फक्त शब्दांनाच जमते.व्यक्ती स्वत:च्या मनाशी रोज काहीना काही बोलत असते. मनाशी होणारा हा स्वतःचा संवाद शब्दांनीच होत असतो. व्यक्तीचे सुप्त मन सुखावते ते फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी. या सुप्त मनाला होणारा हा शाब्दिक आधार व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतो. हा आनंद कुठल्या ही भौतिक वस्तूमुळे होत नाही. तो होतो प्रेमाच्या दोन शब्दांनी. म्हणून असे म्हणतात की व्यक्तीने आपले शब्द जपून वापरावे. कुणाचे मन दुखावेल असे काही बोलू नये. परंतू आजकाल व्यक्ती खूप व्यस्त झाला आहे. त्याला कुणाशी बोलायला वेळ नाही. तो विविध सोशल साईट वर अनोळखी व्यक्तींशी लिखीत स्वरुपात खूप बोलतोय.  

परंतू त्याला हे लक्षात येत नाहीये की, तो ज्या कुणाच्या सहजीवनात जगतोय. त्यांना त्याच्या दोन प्रेमळ शब्दांची किती गरज आहे ? त्याच्या या दोन शब्दांनी जन्मदात्यांचे, पतीचे- पत्नीचे, मुलांचे काही दिवसांनी आयुष्य वाढेल. ज्या साठी तो धाव-धावतोय त्या सर्वांना पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे काही लागत नसून. त्यांना हवे आहेत मनाला सुखावणारे ओले दोन प्रेमळ शब्द. आजच्या वातावरणात हेच दोन प्रेमळ शब्द,  प्रेमळ संवाद कुठे तरी हरवलाय. मना-मनात निर्माण झाली आहे एक दरी, ती ही शब्दांमुळेच. दुखावली गेली आहेत नाती, मन ते ही शब्दांमुळेच. शब्द हे असे हत्यार आहे. जे असा घाव करतात की मनावर होणारी ओली चांगली-वाईट जखम कायम स्मरणात ठेवतात. मन जिंकणे सर्वांनाच जमत नाही. कारण मनावर राज्य करतील असे शब्द सर्वांनाच सुचत नाही. बाल कवी, बहिणाबाई, मंगेश पाडगावकर, मर्ढेकर या सारख्या कवींच्या कविता आज ही मना मनात अधिराज्य गाजवताय ते शब्दांमुळेच. म्हणून आज प्रत्येकाने लक्षात घ्यावे की, शब्द हे मनाचे आधार आहे. 

- सचिन काळे, जालना ( ९८८१८४९६६६) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकliteratureसाहित्य