शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जैसे जैसे करावे...तैसे तैसेच पावावे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 16:07 IST

आपण अन्यायाने वागून, दुसºयाकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे खचितच गैर आहे.

समाज हा आरसा आहे. तुम्ही जसे त्यांस सामोरे जाल तसेच प्रतिबिंब तुम्हांस दिसेल. आपण अन्यायाने वागून, दुसºयाकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे खचितच गैर आहे. पण हे अनेकांस उमगत नाही. आणि तेच त्यांच्या दु: खाचे कारण होते. थोडक्यात पेरावे तेच उगवते अशी म्हणी काही खोटी नाही. अवगुणापासून सदैव दूर राहायला हवे. या अवगुणांपासून स्वत:चे रक्षण केले तरच उत्तम गती प्राप्तं होते. दुसºयाची निंदा करणे हा एक अवगुण असून, परपीडा, परनिंदा करणे तसेच दुसºयाचे धन, वस्तू अथवा स्त्री चे हरण करणे, थोरांस योग्य तो आदर न देणे, स्व बळावर उन्मत्त होऊन दुसºयाला त्रास होईल असे वागणे पाप आहे. असे केल्याने दुष्कीर्ती होऊन अधोगती होते. नकारात्मक विचार हे देखील मनुष्याच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.       मी, माझे या भांडणात शांती, सुख, समाधान निघून गेले आहे. दु:ख, दैन्यं आणि अवगुणांचे वास्तव्य राहिले. ही स्थिती आपली होऊ नये म्हणून 

ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचिती ।जन्म दो दिसांची वस्ती । कोठेतरी करावी ॥ हे जग नश्वर आहे, जीवन क्षणभंगुर आहे हे जाणून वृथा त्याचा लोभ ठेवू नये. निर्लेप वृत्तीने जीवन व्यतीत करावे. आपली मयार्दा जाणावी, आपले विहित कार्य विरक्तपणे करत जावे म्हणजेच या आयुष्याचे ओझे होणार नाही. या सृष्टीवर आपल्या इतकाच इतर प्राणिमात्रांचाही तितकाच हक्क आहे हे जाणून घ्यावे, म्हणजे अधिकारासाठीचा संघर्ष संपेल. क्रोध, मद, मत्सर आणि त्या योगे येणारे क्रौर्य लोप पावेल आणि हे जग आणि जगणे सुंदर होईल. अशा प्रकारे समर्थ अतिशय सुलभ पद्धतीने मनुष्य जन्माचे प्रयोजन सांगतात. देह हा परमार्थाचे साधन आहे. जो हे जाणत नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे.

- शून्यानंद संस्कारभारती

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक