शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्राद्धकर्मात तीन पिढ्यांचाच उल्लेख का करतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 09:56 IST

भूलोकांपासून स्वर्गात पोहोचण्यास लागणारा काल तीन पिढ्या म्हणजेच साधारणत: साठ ते शंभर वर्षांचा काल गृहीत धरलेला आहे. त्यानंतर मृताला स्वर्ग किंवा कर्मानुरूप गती प्राप्त होते.

भूलोकांपासून स्वर्गात पोहोचण्यास लागणारा काल तीन पिढ्या म्हणजेच साधारणत: साठ ते शंभर वर्षांचा काल गृहीत धरलेला आहे. त्यानंतर मृताला स्वर्ग किंवा कर्मानुरूप गती प्राप्त होते. तेव्हा त्यांना येथील कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा राहत नाही. आपला येथील अनुभवही असाच आहे. तीन पिढ्यांपेक्षा मागील पिढ्यांची आपल्याला फारशी माहिती नसते. आणि त्या दृष्टीने आपला ओढाही नसतो. या कारणांमुळे श्राद्धकर्मात तीनच पिढ्यांचा उल्लेख केला जातो.

वसू, रुद्र आणि आदित्य

पितरांचा उल्लेख करताना त्यांना आपण वसुरूप म्हणतो, आजोबांना रुद्ररूप म्हणतो तर पणजोबांना आदित्यरूप म्हणतो. मृत झाल्यावर मृतात्म्याला प्राप्त होणा-या त्या तीन अवस्था आहेत. पृथ्वीच्या आसपास असणारा म्हणजेच जो नुकताच मृत झालेला असतो त्याला वसुरूप म्हणतात. जरा दूर गेल्यावर म्हणजे भुवर्लोकांच्या आसपास गेला म्हणजे त्याला रूद्ररूप म्हणतात आणि त्याच्या वर गेला म्हणजे त्याला आदित्यस्वरूप म्हणतात. अशा त-हेने तीन स्वरूपांतून मृतांचा स्वर्गापर्यंतचा प्रवास असल्यामुळे त्यांना वसू, रूद्र व आदित्यस्वरूप असे म्हणतात. या सर्व गोष्टी अतिंद्रिय असल्यामुळे कोणीतरी कोणीतरी प्राचीन अशा ज्ञात्यांनी संशोधन करून लोकांना पटवल्याआणि रूढ केल्या. त्या प्रचारात आहेत म्हणून आपण बोलू शकतो. अभ्यास करून अशा ज्ञानाचा पडताळा पाहून त्या ताज्यातवान्या ठेवणे कर्तव्यकर्म आहे. श्रद्धापूर्वक कर्म करणे व ज्ञात्यांनी शोधलेली तत्त्वे पुढील संशोधनाकरिता शुद्ध स्वरूपात ठेवणे एवढे केले तरी आपले कर्तव्य केले, असे होणार आहे. ही स्वरूपे पितरांना क्रमाने प्राप्त होतात व त्या स्वरूपात आपण त्यांना कृतज्ञता बुद्धीने साह्य करीत असतो. हे करीत असताना त्यांची अनेदकाबद्दलची वासना हळू हळू शांत करण्याचा प्रयत्नही आपण करीत असतो.

पुरुद्राद्रव व धूरिलोचन

पुरूरव व आर्द्रव हे देव प्रति सांवत्सरिक श्राद्धामध्ये येतात. धूरिलोचन संज्ञक देव महालयात स्वीकारण्यात येतात. या देवता पितरांच्या त्या-त्या स्थानांच्या मुख्य आहेत, असे म्हणतात. इष्टि श्राद्धात ऋतु व दक्ष, वृद्धी श्राद्धात सत्य व वसू, नैमित्तिक श्राद्धात काम आणि काल, काम्य व महालय श्राद्धात धूरिलोचन, पार्वण श्राद्धात पुरूरव व आर्द्रव आणि नवान्नलंभन श्राद्धात काम व काल, असे देव ठरलेले आहेत.

एका वर्षात ९६ वेळा श्राद्ध

पितरांचे श्राद्ध करण्यासाठी एक वर्षात ९६ प्रसंग सांगितलेले आहेत. हे आहेत १२ महिन्यांच्या १२ अमावास्या, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुगाच्या प्रारंभ तिथी, मन्वांच्या १४ आरंभ तिथी, १२ संक्रांत, १२ वैधृती योग, १२ व्यतिपात योग, महालय श्राद्धातील १३ तिथी, पाच अष्टका, पाच अन्वष्टका, पाच पूर्वेद्युह असे एकूण ९६ श्राद्ध होतात.

श्राद्धविधीत करावयाचे महत्त्वाचे विधी

स्मृतीकालीन व सध्या प्रचलित असलेल्या श्राद्धविधीत खालील गोष्टी आढळतात-१) आचमन, प्राणायाम२) आत्मशुद्धी व द्रव्यशुद्धी३) देवब्राह्मणांचे आमंत्रण, विस्तृत पूजन४) पितृब्राह्मणांचे आमंत्रण, विस्तृत पूजन, अग्नौकरण५) अन्ननिवेदन६) अन्न सूक्तादिकांचे पठण७) ब्राह्मण भोजन८) रक्षोघ्नसूक्त पठण९) सुवासिनी भोजन१०) पिंडदान११) पिंडपूजन१२) विकीर१३) पितरांची प्रार्थना१४) पिंडोद्धारण- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक