शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वास्तुशास्त्र म्हणजे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:42 IST

निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे .

- मकरंद सरदेशमुखनिसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे . मेडिकल प्रॉब्लेम कमी असायचे गावाकडील कोणता ही शेतकरी पहा त्याचे आरोग्य शहरातील माणसापेक्षा नक्कीच चांगले असते कारण शेतकरी शेतामध्ये दिवसातील १२ तास हवेत उजेडामध्ये  , उन्हामध्ये राहुन काम करतो आणि शहरातील माणुस १२ तास बंदिस्त रूममध्ये बसुन काम करतो .शरीराला आवश्यक हवा , उजेड , सुर्यप्रकाश मिळतच नाही त्यामुळे आरोग्याच्या समस्याया वाढत आहेत येणारी पुढची पिढी आपले वंशज हे चार भिंतीचा आत स्वतःला बांधून घेणार हे पूर्वीचा काळातील ऋषी मुनी यांना माहित होते त्यामुळे त्यांनी निसर्गनियमानुसार घर कसे बांधता येईल याचा शास्त्रोक्त अभ्यास करून मयमुनी मयासुर व विश्वकर्मा यांनी भारतीय वास्तुशास्त्राची ग्रंथरचना केली आणि वेदिक पद्धतीने बांधकाम कसे करता येईल याची शास्त्रोक्त माहिती मयमतम व विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये दिली आहे .२) वास्तुशास्त्राचे फायदे१) वास्तुशास्त्रानुसार घर असल्याने माणुस जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ रहातो.२) पृथ्वीचा मॅग्नाटिक फिल्ड नुसार उत्तरेला पाय करून झोपल्याने आरोग्य सुधारते .३) आग्नेयेला किचन असल्याने स्वयंपाक रुचकर , स्वादिष्ट , पौष्टिक होतो त्यामुळे चांगले अन्न तयार होते व शरीर सुदृढ होते .४) घर वास्तुनुसार असेल तर शिक्षण  , आरोग्य , व्यवसायत भर -भराट  उत्तम  राहते.५) शुभऊर्जा घरामध्ये संतुलित राहिल्याने आनंददायी वातावरण कायम राहते व घरातील सगळ्यांची  मानसिक , शारिरीक , अध्यात्मिक प्रगती होते .६) मुलांची शारिरीक , बौद्धिक , मानसिक , शैक्षणिक  प्रगती  चांगली  होते .७) नव नवीन कल्पना आयुष्यात सुचतात व व्यवसायात प्रगतीमध्ये चांगली वाढ होते व आर्थिक आवक चांगली राहते .८) वास्तुनूसार  घर  असेल  तर नातेवाईक संबंध व शेजारील मित्र यांच्याशी सलोख्याचे प्रेमळ संबंध राहतात .९) बांधकामाचे नियम शास्त्रोक्त पद्धतीचे असल्यामुळे केलेल बांधकाम कायम स्वरूपी टिकुन राहते .१०) पाणी , अग्नी , वायु , पृथ्वी  व आकाश या पंचतत्वांचा एकत्रीत संतुलनामुळे वास्तुमध्ये शुभ ऊर्जा कायम टिकुन राहते व घरातील सर्वांचा सर्वांगीण प्रगती चांगली होते .

(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)