शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 13:49 IST

मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय. मनामध्ये प्रबळता, उत्साह यांचा प्रवेश होणे म्हणजेच मनाचे येणे होय. मनाचे येणे आणि जाणे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मनामध्ये वाईट विचार आले, मनामध्ये हित भावना निर्माण झाली की मन मोहित होते. मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात.ज्यावेळी अर्जुनाचे मन त्याच्यासोबत होते, त्यावेळी त्या मनाची साथ त्याला होती. तो युद्धाला तयार झाला होता. रणांगणावर शूरवीरपणाने युद्धास सज्ज झाला होता. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून विजयाचे स्वप्न पाहू लागला; पण जेव्हा अर्जुनाची मनाने साथ सोडली तेव्हा तो कर्तृत्वहीन झाला. तो युद्ध करायला नकार देऊ लागला. त्याचे तोंड सुकले, गांडीव धनुष्य हातून निसटले. तो स्थिर नव्हता. मनाने साथ सोडली तशी अर्जुनाची अवस्था बिकट झाली. जेव्हा मन साथ सोडते त्यावेळेस कर्तृत्व, क्षमता, आत्मबल या सर्वांचा कोप होतो; पण मनाची साथ असली की साधना, आत्मबल, क्षमता, धैर्य यांच्यात प्राप्ती होते. आपलं चांगलं व्हावं, चांगल्या गोष्टी मिळाव्यात यासाठी मनाच्या प्रसन्नतेची फार गरज आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक