शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:26 IST

आषाढी वारी

संताचिये पायी हामाझा विश्वाससर्वभावे दासझालो त्यांचा संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानकाकांच्या पालखीचा अनोखा संगम सासवडमध्ये पाहायला मिळतो. सासवडमध्ये संत सोपानकाका यांच्या पालखीचे प्रस्थान होते. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी संतांचे स्थान आहे, त्या ठिकाणावरुन त्या त्या संतांची पालखी प्रस्थान करते. त्यामुळे आषाढी वारीत मानाच्या पालख्यांचा सन्मान केला जातो. श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र मेहून येथून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी निघते. अशा अनेक ठिकाणांवरून पालख्या वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या सर्व पालख्यांचे स्वागत पंढरपूर येथे केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये हे वेगळेपण आहे की, संत कोणत्याही जातीतील असो किंवा पंथातील असो त्यांचा समावेश वारकरी संप्रदायामध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी ही एकच जात पाहिली जाते. त्यामुळेच वारकरी परंपरेमध्ये स्त्री-पुरुष, जात-पात, वर्ण-आश्रम, धर्म-पंथ पाहिले जात नाही. विश्वामध्ये व्यापक विचार मांडणारा केवळ एकमेव वारकरी संप्रदाय आहे. हे विश्वची माझे घरऐसी मती जयाची स्थिरकिंबहुना चराचर आपण जाहलोया संत वचनाप्रमाणे वारकरी परंपरा व्यापक पाहायला मिळते. कारण या पालखी सोहळ्यामध्ये स्त्री-पुरुष सर्वजण एकत्रित पद्धतीने फुगडी खेळणे आणि पाऊले खेळणे असे विविध प्रकार वारीमध्ये चालत असताना पाहायला मिळतात. भेदभावरहित होऊन समन्वयाने भजन, कीर्तन करत ही सर्व मंडळी पंढरपूरकडे चालत येतात. वारी कालावधीमध्ये चालत असणाºया भाविकांच्या मनात सात्विक भाव असतो.  प्रत्येकजण एकाच विचारांमध्ये चालू राहतो की, मला माझ्या पांडुरंगाला भेटायचे आहे. या विचारांमध्ये चालत असताना आपण संत ज्ञानेश्वर माऊलींबरोबर म्हणजेच एका महान संतांबरोबर चालत आहोत याचे समाधान असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्मिक समाधान प्राप्त झाल्याचे त्यांच्या चेहºयावरून ओसंडत असते.  वैचारिक आणि श्रद्धायुक्त प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये फक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहावयास मिळतो. कारण श्रद्धाची विशिष्ट उंची व बौद्धिक उंची पालखी सोहळ्यांमध्ये चालत असताना पाहावयास मिळते. त्यामुळे वारकरी भाविकांना पालखी सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे आमंत्रण द्यावे लागत नाही. लौकिक उपचाराची अपेक्षा न ठेवता वारकरी भाविक सोहळ्यामध्ये सहभागी होतात. हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर