शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 09:13 IST

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआता सध्या वारकऱ्यांना पंढरपूरचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात हा मोठा उत्सव आहे. ‘पंढरपूरची वारी’ हा अनेक पिढ्यांचा ठेवा आहे. न चुकता दरवर्षी वारी करणारी अनेक घराणी आहेत. वारकऱ्यांचा मूळ स्वभाव सात्त्विक होय. कारण वारी सात्त्विकतेतून येते. वारक-यांचे ‘मन’ निर्मळ असते. आपल्या मनाच्या भावछटा वारकरी वारीत व्यक्त करतो. प्राचीन काळापासून वारकरी एकनिष्ठेने राहातो. वारक-यांचे मन अढळ असते. आपल्या ध्येयासाठी तो जागृत असतो. स्व-तत्त्वाची त्याला जाणीव असते.

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो. दुस-याच्या सुखात आनंदाने सहभागी होणारा, छल-कपट न करणारा, वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात रमतो. मिळेल तेथे निवारा शोधणारा, पंढरीचा आवडता असणारा वारकरी जगण्याचे भान आणून देत असतो. वारक-यांचे मन पवित्र असते. चिखल, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तो आनंदाने माउलींसोबत चालतो. माउलींंवर विश्वास ठेवून जगत असतो.

कर्तृत्वाची मशागत करत असतो. प्रेमाची शिदोरी वाटत असतो. अंतर्बाह्य एका विठ्ठलाला शोधत असतो. वारक-यांच्या मनाची स्थिती, लय, गती विठ्ठल होऊन जाते. जगत्रूप विठ्ठलरूप आहे, असे समजून चालतो तो वारकरी. समानतेची बीजतत्त्वे वारीत सापडतात. धर्माची परिभाषा वारीत कळते. आत्मोद्धाराची वाट मोकळी होते. कर्म-धर्माची शिकवण वारीत मिळते. वारक-यांचे भांडवल म्हणजे प्राणिमात्रावर दया करणे. समाजाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणे होय.

पाखंडी लोकांचे खंडण करणे. कर्मकांडाला छेद देणे, भागवत धर्माचा विस्तार करणे, हे वारकरी सातत्याने करत असतो. प्राचीन काळापासून-आधुनिक काळापर्यंत वारकरी तग धरत आहे. अनेक शासक आले तरी वारकरी मात्र डगमगला नाही. अढळपणे आपले कार्य करीत राहिला. वारक-यांचे मन कणखर असते. दया, धर्म, नीती, अहिंसा या मूल्यांचा तो पुरस्कर्ता आहे. सातत्य त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य असते. मनाची स्थिरता कशी करावी वारक-यांकडून शिकावे. वारक-यांचे मन अथांग सागरासारखे असते. अखंडितपणे मनाला सावरणारे असते. मनाचे मनपण वारीत कळते.(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीspiritualअध्यात्मिक