शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

वासनेच्या ज्वालामुखीने प्रेमातील उदात्तपणा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:14 IST

आज आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते प्रेम नसतेच. तो असतो वासनेचा ज्वालामुखी.

- हभप भरतबुवा रामदासी बीड 

आचार्य रजनीशांचे एक सुंदर वचन आहे. आचार्य म्हणतात, ‘प्रेम खोजनेकी कला नही है, प्रेम खोने की कला है! प्रेम जिने की कला नही है, प्रेम मरणे की कला है! प्रेम लेन नही है, प्रेम देन है! प्रेम माँग नही है, प्रेम दान है! प्रेम भिक नही है, प्रेम तो स्वयं का समर्पण है. .....!’शुद्ध प्रेमाचे हे चिंतन वाचल्यावर असे वाटते की, या बाजारू जगात निष्काम प्रेम करणारे सापडतील का. .? असा प्रेमातला उदात्तपणा आज खरंच हरवला आहे का. ? प्रेम कधी शब्दातून व्यक्त केले जात नाही. प्रेम एक दिव्य अनुभूती आहे. ती शब्दातीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात,प्रेम नये सांगता बोलता दाविता !अनुभव चित्ता चित्त जाणे!!आईचे निष्काम, निरागस प्रेम कोणत्या मापाने मोजणार ..? एक मुलगा डॉक्टर आहे. भरपूर पैसा मिळवतो. गावात मान, मरातब, प्रतिष्ठा आहे. म्हणून आई त्याच्यावर खूप प्रेम करते का. .? व दुसरा मुलगा सेवक आहे. निर्धन आहे. म्हणून आई त्याला लाथाडते का. ? सज्जनहो. .! मुलगा कसाही असला तरी आईच्या प्रेमात तिळमात्र फरक नसतो. तुकोबा म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती!करी लाभाविन प्रीती!!आज मानवी जीवनातल्या परस्पर संबंधातील प्रेमाचा उदात्तपणा संपत चालला आहे. आज दिसते ते फक्त उथळ व बेगडी प्रेम. आज आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते प्रेम नसतेच. तो असतो वासनेचा ज्वालामुखी. प्रेम तर खूप नितळ असते. आज शरीराच्या आकर्षणालाच लोक प्रेम म्हणतात.आज पतीने मनासारखी साडी घेतली नाही म्हणून पतीपासून घटस्फोट घेणारी पत्नी वर्तमान काळात दिसत आहे. याला प्रेम म्हणणार का. .? वडीलांनी मौज मजा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वडीलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करणारा मुलगा आजच्या वर्तमान काळात दिसतो, याला प्रेम म्हणणार का. .? सज्जनहो. ..! वासनेने आंधळे झालेले प्रेम हे प्रेम नसतेच. असे प्रेम हे प्रेमाची यात्रा नसते ती वासनेची जत्रा असते. आज कथा, कादंबरी व चित्रपटात दाखवणारे प्रेम हे बेगडी असते. कारण. ...प्रेमाला ठावे देणे, देण्यातच हरवून जाणे! प्रेम यज्ञी पूर्णाहूती कर्त्याने संपून जाणे!!व्यवहारातले गणित असे असते, जो स्वत:ला वाचविल तो वाचेल व जो स्वत:ला संपवील तो संपेल. प्रेमाचे गणित या उलट आहे. प्रेमाच्या राज्यात जो जो संपून जायला तयार असतो तोच वाचतो व जो स्वत:ला वाचवू पाहतो, तो संपून जातो. कारण प्रेमाला ठावे देणे. ..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक