शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

एकला विजया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:40 IST

बा. भो. शास्त्री जय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर ...

बा. भो. शास्त्रीजय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर धर्म सांगतात. अनुकरण कृतीचं असतं व अनुसरण विचाराचं असतं. अनुकरणानं फसगत होते व अनुसरणातही पतन होतं. तेव्हा काय करावं, असं नागदेव श्रीचक्रधरांना विचारतात. त्यातून सावरण्याचा मार्ग आहे का? तेव्हा स्वामींनी ‘एकला विजया’ हे सूत्र सांगितलं. आपण तीन कप्प्यांत जगणारी माणसं आहोत. एक सामाजिक, दुसरा कौटुंबिक, तिसरा वैयक्तिक. प्रत्येक कप्प्याचे अनुभव वेगळे असतात. समाजात वावरताना सन्मान, अपमान मिळतो. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा मिळतो. तिसरा व्यक्तिगत कप्पा महत्त्वाचा असतो. इथंच वैयक्तिक आवडी-नावडी जपता येतात. एकमताने निवड करायची ही एकमेव जागा असते. एकांतात भावी नियोजनाला वाव मिळतो. त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं हे लक्षात घ्यावं. नागदेवाचं सामाजिक जीवन विकार-विकल्पाने भरलेलं होतं. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं. सर्वत्र पराभव झाला. आता विजयाची उपलब्ध करून देणारी एकच जागा शिल्लक होती. जी तुकोबांना सापडली,‘येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतआकाश मंडप पृथिवी आसन, रमे तेथे मन क्रीडा करीवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’असा एकला साधक विजयाचा अधिकारी आहे; पण संसारिकाचं काय? त्यासाठी हे सूत्र आहे. साधक नित्य, तर गृहस्थ दिवसातून तासभर एकला असावा. लोकांतात जय, तर एकांतात एकट्याचा विजय आहे. आपल्यातल्यांना आपलंसं करून घेता येतं. कोण आपल्यातले नकारात्मक ऊर्जा देणारे आपले मनोविकार असतात, त्यांना आपुलाची वाद आपणासी करून सकारात्मक ऊर्जा देणारे करता येते. तेव्हा क्रोधाला बोध, मोहाला विमोह करता येतं. संत मीरा एकटी एकतारी होती. एकदा तानसेनने मीराचं गायन ऐकल्यावर म्हणाला, ‘तू छान गातेस, पण तुझ्या गाण्यात राग दिसला नाही.’ मीरा म्हणाली, ‘मी रागात नाही अनुरागात गाते.’ हा अनुराग वैयक्तिक कप्प्यात तयार होतो.