शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

वन्दे मातरम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:40 IST

‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ समर्थ सांगते झाले़ कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न बाळगता निरपेक्ष बुद्धीने भारतमातेसाठी सेवाकार्यरत असणारे असंख्य ऋषी, साधुसंत, विचारवंत होऊन गेले, ‘कुणी त्याची गणती ठेविली असे?’ १५ आॅगस्ट १९४७ भारत भू स्वतंत्र झाली.

- डॉ. गोविंद काळे‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ समर्थ सांगते झाले. कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न बाळगता निरपेक्ष बुद्धीने भारतमातेसाठी सेवाकार्यरत असणारे असंख्य ऋषी, साधुसंत, विचारवंत होऊन गेले, ‘कुणी त्याची गणती ठेविली असे?’ १५ आॅगस्ट १९४७ भारत भू स्वतंत्र झाली.  परदास्याच्या शृंखला गळून पडल्या़ देशभर एकच घोषणा ‘वन्दे मातरम्। वन्दे मातरम्।’ पुढे तर बाबूजींनी गायिलेले ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्देमातरम्’ मराठी माणसाच्या अंत:करणाचा ठाव घेते झाले.‘वन्दे मातरम्’ पहिल्यांदा कुणी उच्चारले असेल? कुणी लिहिले असतील हे दोन शब्द? त्याने आपला ठावठिकाणा सांगितला नाही. त्याचा शोध घ्यावासा वाटतो, पण तो कसा आणि कुठे भेटणार? संस्कृत बृहत् स्तोत्ररत्नाकरची फार जीर्ण झालेली आवृत्ती मिळाली. या ग्रंथामध्ये देवदेवताविषयक अनेक स्तोत्रे आहेत़ त्यातील अनेक स्तोत्रे मुखोद्गत असणारी मंडळी आजही विद्यमान आहेत. ग्रंथातील स्तोत्रांचे वर्गीकरण गणेश स्तोत्राणि, शिवस्तोत्राणि, देवीस्तोत्राणि अशा पद्धतीने केले आहे. भारतमाता ही देवीस्वरूप आहे त्यामुळे देवीस्तोत्राणि विभागाच्या सुरुवातीस भारतभूमातृ स्तोत्रम असून त्या स्तोत्राची सुरुवातच मुळी ‘वन्दे मातरम्’ शब्दाने करण्यात आली आहे.‘वन्दे मातरम् अव्यक्तां व्यक्तांच जननीं पराम्दीनोऽहं बालक: कांक्षे सेवां जन्मनि जन्मनि’हे माते जन्मोजन्मी ह्या दीन बालकाला तुझी सेवा करण्याचे भाग्य लाभो अशी इच्छा व्यक्त होते़ देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे स्तोत्र नव्या बृहत्स्तोत्र रत्नाकर आवृत्तीतून गायब झाले आहे़ कर्ता कोण त्याचा नामनिर्देश आढळत नाही़ सत्कर्म करणारे सर्व भारतीय पुराणपुरुष सत्कीर्तीला मूठमाती देऊनच मन:पूर्वक योगदान देत होते़ कमवायचे तर त्यांना काहीच नव्हते़ सेवा हेच त्यांचे जगणे होते़ कोणतीही नावनिशाणी मागे न ठेवता मनुष्य जन्म सार्थकी लावून कृतार्थ व्हावे ही एकच उदात्त आकांक्षा होती़शाळा-महाविद्यालयातून, मठ-मंदिरातून एवढेच नव्हे तर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाची सांगता भारतभूमातृ स्तोत्राच्या सामूहिक पठनाने व्हायला काय हरकत आहे़निरंतरं भवतु मे मातृसेवांशभाग्यभाक्।एषैव वांछा हृदये साक्षी सर्वात्मक : प्रभु: ॥निरंतर भारतमातेची सेवा हीच एकमेव इच्छा सर्व भारतीयांची असली पाहिजे़

टॅग्स :spiritualअध्यात्मिक