शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:44 IST

काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

एका विशिष्ट क्षणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला दिलेला साज म्हणजे आटोपशीर, स्वयंपूर्ण असे शब्दरूप होय. त्यातून अभंग, काव्य किंवा साहित्यातील विविध प्रकारात मोडणारे वाङ्मय तयार होते. नंतर तोच विचार कायमस्वरुपी राहील असेही सांगता येत नाही. तो विचार नंतरच्या काळात निष्प्रभही होऊ शकेल. कारण ज्यावेळी संसारदु:खाने पोळलेली मनाची अवस्था असेल त्यावेळी त्याची स्थिती बिघडलेली असेल. संवेदनात्मक मनोभूमिकेत असणाऱ्या मनाची अवस्था त्या-त्या क्षणी सारखीच असू शकत नाही. विचारगर्भ किंवा भावनोत्कट मनाचे सहजोद्गार असतात. काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते. म्हणजे मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी आहेत. त्याचा आपण विचार करतो. मानवी जीवनाची कृतार्थता कोणत्या गोष्टीत आहे याचे विश्लेषण संतविचारांनी भावलेले मनच निर्णय देऊ शकते. मनाच्या या विविध आविष्कारामुळे त्याचा अधिकार समाजाच्या सर्व स्तरातून पाहायला मिळतो. प्रापंचिक दु:खांनी गांजलेले स्त्री-पुरुषाचे ‘मन’ नव्या आनंदमयी अशा वातावरणात रंगून जाते किंवा कधी-कधी आत्मसात केलेल्या ज्ञानाचे प्रात्यक्षिकिकरण दाखवते. साऱ्यांच्या जीवनाचे प्रयोजन मनच करीत असते. जन्म-मरणाच्या फेºयातून निरंतराची मुक्तता अनुभवण्याची किमयाही मनाचीच असते किंवा भक्तिप्रेमाचा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला पुन: पुन्हा हा जन्म मिळावा ही अपेक्षा करणारेही मनच होय. कारण ईश्वरकृपेचा अनुग्रह व्हावा ही अपेक्षा बाळगणारे मनच असते. यामुळे जीवनात सुख जिवापाड असले तरी दु:ख पर्वताएवढे असते. याचाही अनुभव घेणारे मन. परमेश्वराने आपल्याला या दु:खमय संसारातून सोडवावे असे वाटणारेसुद्धा ‘मन’च होय. काही जणांच्या जीवनात वैफल्य येऊन या संसाराला कंटाळवाणेही मनच असते, तर काही जणांच्या भावमनाने परमेश्वरापाशी पोहचविणारे मनच असते. या संसारातील सुख-दु:खांच्या पाठीमागे मनच कार्यरत असते. त्यामुळे सर्वकाही मनावरच अवलंबून आहे. मन आनंदी ठेवा. सर्वदूर आनंद मिळेल.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक