शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी माळ

By admin | Updated: August 29, 2016 16:11 IST

वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते

- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते. वारकरी तुळशीमाळ हेच भूषण मानून गळ्यात ती धारण करतो. खरे म्हणजे ही दीक्षा घेणे म्हणजे ईश्वर कार्यासाठी जीवन समर्पित करणे असा अर्थ आहे. जेव्हा भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो. किंवा जल अर्पण केले जाते त्यावेळी त्यावर तुळशीपात्र ठेवले जाते. ते म्हणजे ‘इदं न मम!’ हे प्रभो हे माझे नाही तुझेच आहे. हा भाव त्यामागे असतो. देह देवाला अर्पण करावयाचा झाल्यास त्यावरही असेच तुळशीपत्र ठेवावे लागेल. परंतू असे करणे शक्य होत नाही. त्याकरिता तुळशीकाष्टाचे मणी बनवून त्याची माळ गळ्यामध्ये घातली जाते. ही माळ सातत्याने स्मरण देत असते की तू तुझा देह भगवंतासाठी अर्पण केलेला आहे म्हणून तुळशीमाळ हे भगभ्दवतीचे, भगवंताला समर्पित देहाचे सर्वोच्च प्रतीक आहे. माळेद्वारे हे सातत्याने लक्षात ठेवायचे आहे की, ह्या देहाचा मालक भगवान आहे. चालविणारा तोच आहे आणि नियंता भगवानच आहे. ‘‘क्षेत्रज्ञं चापि मां विध्दि सर्वश्रेत्रेपु भारत’’ आपले शरीर हे केवळ शेत आहे आणि ईश्वर त्याचा मालक आहे. तेव्हा या शेतात काय पेरायचे ते देवच निश्चित करतो. या शरीराकडून जे काही कार्य होते ते प्रभूप्रीत्यर्थ झााले पाहिजे. मानव तर देवाच्या हातचे साधन आहे. म्हणूनच गीतेचा कर्मयोग शिकवितो की मानवाने प्रत्येक कृती भगदर्पण भावाने, कुठलाही अहंकार न बाळगता तसेच फळाची अपेक्षा नकरता केली तर चित्र शुध्दी होते. तसेच हे भक्तीचे प्रमुख साधन आहे. भक्तीसाठी जीवनामध्ये सातत्याने देवाचे अनुसंधान ठेवले पाहिजे हे अनुसंधान सहज त्याच्या नाम चिंतनाने होते. तुळशीमाळ हे सतत भगवंतांच्या नामचिंतनाचे प्रतीक आहे आणि जवळजवळ सर्वधम्र आणि संप्रदाय भगवन्नाम चिंतनाचा आग्रह धरुन आहेत. वारकरी संप्रदायाने भक्तीचे प्रमुख साधनच नामचिंतन मानले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘काय नोहे केले । एका चिंतिता विठ्ठले ।।’’ एका विठ्ठल नामाच्या चिंतनाने मानव जीवनासाठी जे अत्यांवश्यक आहे ते सर्वच प्राप्त होते. परंतू हे चिंतन जाणीवपूर्णक झाले पाहिजे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘‘हरि बुध्दि जपे तो नर दुर्लक्ष ।।’’ याचाच अर्थ जप हा बुध्दि पुरस्सर झाला पाहिजे.