शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आज विजयादशमी... चला, सीमोल्लंघन करूया !

By दा. कृ. सोमण | Updated: September 30, 2017 06:38 IST

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !विजयादशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करावा, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजयादशमीचा दिवस शुभ दिवस समजला जातो. पूर्वी या दिवशी पाटीवर सरस्वती काढून पूजा करीत असत. पूर्वी या दिवशी शिक्षणाचा प्रारंभ केला जात असे. आता या दिवशी संगणकाची पूजा केली जाते.आजचा दिवस सीमोल्लंघनाचा आहे. आळसाकडून उद्योगीपणाकडे, व्यसनाकडून निर्व्यसनाकडे. अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे. भ्रष्टाचाराकडून नीतिमत्ता- प्रामाणिकपणाकडे, बेशिस्तीकडून शिस्तीकडे सीमोल्लंघन करावयाचे आहे. प्रत्येक माणसाला केवळ विजयादशमीच्याच दिवशी नव्हे तर इतर दिवशीही सीमोल्लंघन करावे लागते. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत, माध्यमिक शाळेतून कॉलेजमध्ये, कॉलेजमधून पदवी घेतल्यावर नोकरीकडे किंवा व्यवसायाकडे, काहींना तर नोकरीसाठी आपल्या देशातून दुसºया देशाकडे सीमोल्लंघन करावे लागते. जीवनात वडील होण्याकडून आजोबा होण्याकडे सीमोल्लंघन करावयाचे असते. महिलांच्या आयुष्यात तर माहेराहून सासरी जाताना मोठे सीमोल्लंघन होत असते. जीवनात लहानपणी बाळगलेली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतात. जीवनसाथी कसा आहे हे अगोदर जरी कळले तरी खरी ओळख तेथे सासरी राहिल्यानंतरच होत असते. आपल्या आई-बाबांपासून दूर जाताना मनाची किती घालमेल होत असेल ते स्त्री झाल्याशिवाय कुणाला कळणारच नाही. आपल्या आई-वडिलांशी असणारे नाते वेगळे असते. 'तडजोड' करीत 'लोक काय म्हणतील' ही भीती बाळगून गप्प राहायचे असते. नोकरी असेल तर मात्र घर आणि नोकरी सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. या मुलीचा 'बा' तरी असतो खाली पडल्यावर वरचेवर झेलायला ! इथे तर आपणच तोल सांभाळीत पुढे जायचे असते. पडून चालणारच नसते. बरे रडू आले तर माहेरी मोकळेपणाने रडता तरी येत होते. थोडा वेळ झाला की आई येणार याची खात्री होती. पण सासरी रडू आले तर फक्त बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेऊन रडावे लागते. मनात विचार येतो की मासे पाण्यात कसे रडत असतील. अश्रूंना कशी वाट करून देत असतील ? म्हणून म्हणतो की स्त्रियांचे माहेराहून सासरी जाण्याचे सीमोल्लंघन हे खूप कठीण असते.विजयादशमीच्या दिवशी वाईटाकडून चांगल्याकडे सीमोल्लंघन करता आले तर चांगले आहे. आपल्यातला वाईटपणा व चांगलेपणा हा आपल्याला तरी नक्कीच ठाऊक असतो. यासाठी विजयादशमीचा दिवस एक संधी असते. त्या संधीचा उपयोग करून आपण अधिक चांगले होऊया. आपल्यात चांगला बदल करूया. कारण 'बदल' हीच विश्वात कायम टिकणारी गोष्ट आहे.

टॅग्स :Dasaraदसरा