शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र म्हणजे मातृशक्तीचा, निर्मितीशक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव, आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या तिथीवर आज घटस्थापना नवरात्रारंभ

By दा. कृ. सोमण | Updated: September 24, 2017 21:50 IST

आज गुरुवार, २१ सप्टेंबर, आश्विन शुक्ल प्रतिपदा! आज घटस्थापना - नवरात्रारंभ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सण-उत्सवांची रचना किती कल्पकतेने केली आहे हे त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतल्यानंतरच समजते.

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणीनमो ऽस्तुते ।।आज गुरुवार, २१ सप्टेंबर, आश्विन शुक्ल प्रतिपदा! आज घटस्थापना - नवरात्रारंभ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सण-उत्सवांची रचना किती कल्पकतेने केली आहे हे त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतल्यानंतरच समजते. हे सण आता केवळ धार्मिक राहिलेले नाहीत तर त्यांना सामाजिक- सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. प्राचीन कालापासून भारत हा शेतीप्रधान देश आहे. गणेश चतुर्थीला शेतात धान्य तयार होत असते. त्यामुळे त्या दिवशी पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून धान्य देणाºया पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर येणाºया पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. नवरात्राच्या या दिवसांत शेतातून तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्रात दुर्गादेवीची म्हणजे आदिशक्तीची - निर्मितीशक्तीची पूजा केली जाते. पृथ्वीच्या निर्मिती शक्तीचाच नवरात्र हा एक उत्सव असतो.नवरात्र शरद ऋतूमध्ये येते म्हणून याला ‘शारदीय नवरात्र’ असेही म्हणतात. शरद ऋतूमध्ये शेतातील धान्य घरात आल्यामुळे घर संपन्न होते. वसंतऋतूपेक्षा शरद ऋतू त्यादृष्टीने खूप संपन्न असतो. म्हणूनच आपण दुसºयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘जीवेत् वसंता: शतम्’ असे न म्हणता ‘जीवेत् शरद: शतम्’ असे म्हणतो.नऊ ही ब्रह्मसंख्यादुर्गादेवीचा हा नवरात्रौत्सव नऊ दिवसांचाच का? आठ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा का नाही, असा प्रश्नही विचारला जातो. निर्मितीशक्ती - आदिशक्ती आणि नऊ अंक यांचे एक नाते आहे. बी जमिनीमध्ये गेले की नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यानंतर नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते, नवरात्र हा मातृशक्तीचा, निर्मितीशक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव असतो म्हणून नवरात्र नऊ दिवसांचे असते.आज घटस्थापना आहे. आज दुर्गादेवीच्या मूर्तीचे, नवार्ण यंत्राचे आणि ओली माती मातीच्या घटात ठेवून त्यात गहू किंवा इतर धान्य पेरून त्या घटाची षोडशोपचार पूजा करायची आहे, आज आश्विन शुक्ल प्रतिपदा सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे. तोपर्यंत घटस्थापना करावयाची आहे. समजा एखाद्याला या वेळेत शक्य झाले नाही, तर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही. देवीच्या शेजारी दीप अखंड तेवत ठेवावा. तसेच देवीपुढे दररोज वाढत जाणाºया लांबीची फुलांची माळ बांधावी. नंतर आरती करून सप्तशतीचा पाठ वाचावा.नवरात्राच्या नऊ दिवसांत उपवास करतात. उपवास केल्याने शरीरातील मांद्य निघून जाते. शरीर हलके बनते. त्यामुळे पूजा-उपासना करताना मनाची एकाग्रता साधणे सुलभ होते. आत्मशद्धीसाठी उपवास केला जातो. चित्त शुद्ध होते. मनात वाईट विचार येत नाहीत. काही उपासक नवरात्रात हलका आहार घेऊन उपवास करतात. तर काही भाविक केवळ फलाहारच करतात. तर काही एक वेळ जेवण घेतात. काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात. तर काही भक्त निर्जळी म्हणजे पाणीही न पिता उपवास करतात. मात्र असे कडक उपवास करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तुम्ही एक गोष्ट नीट समजून घ्या की उपवास हे अंतिम साध्य नाही. उपवास हे एक साधन आहे. शरीरास अपायकारक होईल असा उपवास करणे योग्य होणार नाही. या नऊ दिवसांत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर नियंत्रण ठेवावे. त्यामुळे तुमचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढत असतो. कारण कोणत्याही देवतेची पूजा करण्यामागे आपला एकच हेतू असावा तो हा की आपल्यात चांगला बदल व्हावयास हवा. आपण व्यसनी, भ्रष्टाचारी, आळशी, अज्ञानी, अंधश्रद्धेने ग्रासलेले असू तर पूजा केल्याने आपण निर्व्यसनी, नीतिमान, उद्योगी, ज्ञानी, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करणारे व्हावयास हवे आहे. पूजा केल्याने आपण निर्भय व्हावयास हवे आहे. आपल्यात जर असा चांगला बदल जो आपल्याच हातात आहे तो जर झाला नाही, तर पूजा, उपासना करून काहीही साध्य होणार नाही. हे कलियुग आहे. इथे केवळ देवीची पूजा - उपासना करून काहीही साध्य होणार नाही. आपल्यात चांगला बदल करणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. तसे नसते तर रोज मंदिरात देवीची पूजा करणारा पुजारी श्रीमंत झाला असता. त्याला जीवनात कोणताही प्रश्न राहिला नसता. या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत.देवीमाहात्म्यदुर्ग नावाच्या राक्षसाला देवीने ठार मारले म्हणून देवीला ‘दुर्गा’ हे नाव प्राप्त झाले. एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावयास हवी आहे. देवांपेक्षा देवी जास्त सामर्थ्यवान आहेत. पुराणातल्या सर्व कथा आपण वाचल्या तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे ज्या ज्या वेळी देवांवर संकटे आली त्या त्या वेळी देव देवींना शरण गेले; आणि देवींनी देवांना त्रास देणाºया दुष्ट राक्षसांना ठार मारले. त्यामुळेच देवांवरची संकटे दूर झाली. मी हे सर्व तुम्हाला का सांगतो? कारण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की पुरुषशक्तीपेक्षा स्त्रीशक्ती ही जास्त मोठी आहे. आपण हे समाजातही पाहतो. जेव्हा घरातील पुरुषाची काही कारणाने नोकरी जाते. तेव्हा त्या घरची स्त्री ही स्वत: निर्भयपणे बाहेर पडते. कधी कधी घरच्या पुरुषाला वाईट मित्रांच्या ( ? ) संगतीमुळे दारूचे - जुगाराचे व्यसन लागते त्या वेळी घरची स्त्री रडत, नवºयाचा मार खात बसत नाही. तर ती नवºयाला वठणीवर आणते किंवा नाइलाज झाला तर घरातून मुलांना घेऊन बाहेर पडते व स्वत: पैसे कमवून मुलांचा चांगला सांभाळ करते. आता काळ बदलला आहे; आणि अशा स्त्रीशक्तीचा साक्षात्कार व्हायला स्त्रियांचे शिक्षण कारणीभूत आहे. म्हणूनच आज घटस्थापनेच्या दिवशी आपण त्या दुर्गादेवीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना नमस्कार करू या. घरची स्त्री जर सुशिक्षित झाली तर ते घर तर सुधारेलच; शिवाय प्रत्येक घरची स्त्री जर शिकली तर सारा समाज सुधारेल. घराघरांत वावरणारी ही स्त्रीशक्ती देशाची प्रगती घडवू शकेल. मगच खºया अर्थाने नवरात्रौत्सव साजरा झाला असे म्हणता येईल.म्हणून आज आपण देवीला नमस्कार करताना प्रार्थना करू या.या देवी सर्वभूतेषुस्त्रीशक्तीरूपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यैनमो नम: ।।