शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

ब्रह्म मुहूर्ताची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:28 IST

आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३0 ते पहाटे ५.३0 किंवा ६.00, किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत.

- सद्गुरू जग्गी वासुदेवप्रश्न: ब्रह्म मुहूर्ताची नक्की अचूक वेळ काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे आणि आपण त्या वेळात जास्तीतजास्त ऊर्जा कशी प्राप्त करून घेऊन शकतो?ब्रह्म मुहूर्ताचा कालावधीसद्गुरू : आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल साधारणपणे रात्री ३.३0 ते पहाटे ५.३0 किंवा ६.00, किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत.ब्रह्म मुहूर्ताच्या काळामध्ये काय घडते?पृथ्वीचे सूर्य आणि चंद्राबरोबरचे नाते अशा स्वरूपाचे आहे की, मानवी शरीरात या काळात काही विशिष्ट शारीरिक बदल घडून येतात. वैद्यकीय शास्त्राने असेदेखील शोधून काढले आहे की, तुमच्या शरीरातील मलपदार्थ, उदाहरणार्थ लघवीमध्ये या काळात काही विशिष्ट गुणधर्म आढळून येतात, जे दिवसाच्या इतर कोणत्याही कालावधीमध्ये सापडत नाहीत.याविषयी पुष्कळ संशोधन झालेले आहे. संपूर्ण शरीर विशिष्ट अशा अनुकूल वातावरणात असते आणि नैसर्गिकरीत्या पिनियल ग्रंथीमधून स्त्रवणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आपल्याला याचा उपयोग करून घेता येतो. कारण ब्रह्म मुहूर्ताच्या काळात पिनियल ग्रंथीमधून हा स्त्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो, ज्यामुळे आपल्या शरीर यंत्रणेला एक सहज स्थैर्य प्राप्त होऊ शकते.आधुनिक वैद्यकीय शास्त्रात, मेलाटोनिनकडे मानसिक स्थितीचे नियंत्रक म्हणून बघितले जाते. अनेक वेळा मी तुम्हाला स्वत:मध्ये सहजता आणण्याबद्दल सांगितले आहे. सहजता आणणे म्हणजे तुमच्यात कुठलीही अस्थिरता राहिलेली नाही. ही सहजता ब्रह्म मुहूर्ताच्या काळात नैसर्गिकरीत्या साध्य होते. या काळात शरीर आणि विचार यांचा सुंदर मेळ घालता येतो. विचारांवर नियंत्रण मिळविता येते. मन स्थिर करता येते. म्हणून ब्रह्म मुहूर्ताला महत्त्व आहे.या वेळेत, आध्यात्मिक साधना केल्याने त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. ब्रह्म मुहूर्त म्हणजे ‘निर्मात्याचा काळ’. आपण त्याकडे या प्रकारे पाहू शकतो: ही अशी वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वत:ला पुन्हा नव्याने घडवू शकता. तुम्ही स्वत:च ब्रह्मण (निर्माता) बनू शकता आणि स्वत:ला हवे त्या प्रकारे घडवू शकता.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक