शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांसाठी विश्वप्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 04:10 IST

जीवनात आपल्याला हवा तसा बदल करण्यासाठी व विचारांवर नियंत्रणासाठी प्रथम विचारांवर लक्ष ठेवण्याची कला साधता आली पाहिजे.

आपल्याला जर आपले नशीब चांगले घडवायचे असेल तर त्यासाठी आपणही प्रयत्नपूर्वक चांगले, सुखाचे, आनंदाचे, यशाचे, समृद्धीचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे विचार करायला हवेत. जर मनात वाईट, अपयशाचे, दु:खाचे, विचार येत असतील तर ते प्रयत्नपूर्वक बदलून त्यांच्या ठिकाणी सकारात्मक विचार करायला हवेत. कारण.. जर तुम्ही रोगाचे विचार केलेत तर तुम्ही रोगी व्हाल, जर तुम्ही भोगाचे विचार केलेत तर तुम्ही भोगी व्हाल, जर तुम्ही योगाचे विचार केले तर तर तुम्ही योगी व्हाल; आणि जर प्रयत्नपूर्वक यशाचे विचार केलेत तर यशस्वी व्हाल. मग आता चांगले, यशाचे विचार करण्यासाठी नेमके काय करावे तर विचारांचा अभ्यास हवा. १. विचारांकडे पाहायला हवे. २.विचारांना ओळखायला हवे. ३. विचारांना वळवायला हवे.जीवनात आपल्याला हवा तसा बदल करण्यासाठी व विचारांवर नियंत्रणासाठी प्रथम विचारांवर लक्ष ठेवण्याची कला साधता आली पाहिजे. आपल्या मनात एका क्षणात असंख्य इष्ट-अनिष्ट विचार निर्माण होतात. विचारांवर लक्ष द्यायला लागल्यानंतर लक्षात येते की आपली विचार निर्मिती हळूहळू कमी होत आहे. म्हणजे काही क्षणांत निर्माण होणाऱ्या असंख्य विचारांचे प्रमाण कमी होते. साहजिकच मग आपण चांगले विचार करतो की वाईट करतो आहोत हे चटकन लक्षात येऊ लागते. हळूहळू जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक आपण चांगले विचार करून वाईट विचार बाजूला सारू लागतो. असे सरावाने केल्यास आपल्याला चांगले विचार करायची सवयच लागते. खरी जीवन साधना हीच आहे. कारण यातून उत्कर्ष आणि उन्नती होऊन जीवनात खरी प्रगती होते. माणूस यशस्वी होतो. कारण निसर्गाचाच नियम आहे ‘जसा विचार तसा जीवनाला आकार.’ जीवनाला चांगला आकार देण्यासाठी विचार सकारात्मक, व्यापक, सहकारात्मक असावेत.हे सकारात्मक आणि सहकारात्मक विचार सातत्याने, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक करण्याकरिता थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या सर्वांसाठी विश्वप्रार्थना निर्माण केली. ‘‘हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.’’ ही प्रार्थना सुंदर सकारात्मक आणि सहकारात्मक विचारांनी भरलेली, भारलेली आहे. हा व्यापक विचार आहे. तो आपण सातत्याने केला, की साहजिकच आपली विचारशैली सकारात्मक आणि व्यापक होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक