शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला देतात आकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:57 IST

- प्रल्हाद वामनराव पै ‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला ...

- प्रल्हाद वामनराव पै‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात. म्हणून जीवनविद्या सांगते की, विचार तसा जीवनाला आकार आणि म्हणूनच या विचारांकडे प्रयत्नपूर्वक लक्ष दिल्यास लक्षात येते की आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो. यासाठी आपण सतत आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. कारण आपण व्यवहारात पाहतो की जर मुलांकडे नीट लक्ष दिले नाही तर मुले बिघडतात. आर्थिक व्यवहाराकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होते. आरोग्याकडे दुर्लक्ष केले की आरोग्य बिघडते. पत्नीकडे दुर्लक्ष केले की नशीब बिघडते. म्हणजेच आपण व्यस्त जीवन जगत असलो तरी आपण जातीने जसे वरील बाबींकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे विचारांकडे लक्ष द्यायला हवे. आपले विचार हे आपणच निर्माण केलेली आपली मुलेच आहेत.या विचारांना रंग असतो, म्हणजे काही लोक काळवंडलेले विचार करीत असतात. त्यात चिंता, काळजी, दु:ख, खेद, निराशा, भय, त्वेष असे कलुषित रंग असतात तर काहींच्या विचारात आनंद, यश, प्रेम, सुख, समाधान यांचे सुंदर रंग भरलेले असतात.विचारांना गंध असतो म्हणजे एखाद्याचे मत्सराचे विचार ऐकले की आपण सहज म्हणतो याच्या बोलण्यात कुजकट वास येतोय. याउलट काहींच्या बोलण्याला प्रेमाचा, मायेचा सुगंध येतो. विचारांना आकार असतो कारण काहींचे विचार हे छोटे, स्वत:भोवती फिरणारे, संकुचित वृत्तीचे असतात तर काहींचे विचार हे मोठे व्यापक, देशहिताचे, सर्वांच्या कल्याणाचे असतात.विचारांना तेज असते कारण काहींचे विचार तेजस्वी असतात. असे तेजस्वी विचार ऐकल्याने इतरांना स्फूरण येते, प्रेरणा मिळते. असे समाजाला दिशा दाखवणारे, तेजस्वी विचार देणारे अनेक महात्मे, तत्त्वज्ञ या भारतभूमीत जन्माला आले. त्यांच्या विचारांचे आचरण केल्याने आपलेही विचार व्यापक होऊ शकतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक