शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विचारांची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:35 IST

आपले विचार हेच आपल्या मनाचे अन्न असते. आपले शरीर सुदृृढ राहण्यासाठी जसे आपण पौष्टिक व सकस अन्न घेतो तसे आपल मन सशक्त राहण्यासाठी आपले विचार हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. अध्यात्मामध्ये विचारांना साधारणपणे चार भागात विभागल्या जाते.

- प्रा.डॉ. संदीप ताटेवार

आपले विचार हेच आपल्या मनाचे अन्न असते. आपले शरीर सुदृृढ राहण्यासाठी जसे आपण पौष्टिक व सकस अन्न घेतो तसे आपल मन सशक्त राहण्यासाठी आपले विचार हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. अध्यात्मामध्ये विचारांना साधारणपणे चार भागात विभागल्या जाते. पहिले म्हणजे उच्च दर्जाचे विचार, दुसरे म्हणजे साधारण विचार, तिसरे म्हणजे नकारात्मक विचार व चौथे म्हणजे अनुपयोगी विचार. जीवन जगताना आपले जास्तीत जास्त विचार उच्च दर्जाचे असणे आवश्यक आहे.असे म्हणतात की सामान्य मानसिक अवस्थेत आपल्या मनात साधारणपणे ३० ते ४० हजार प्रतिदिन विचार येत असतात. रात्री झोपेत आपल्या विचारांची गती खूप कमी असते.जेव्हा मन चिंतेत असते तेव्हा विचारांची संख्या जास्त असते मात्र जेव्हा मन शांत असते तेव्हा ती कमी असते. आपल्या मनात बहुदा नकारात्मक विचार येण्याची संख्या जास्त असते तर सकारात्मक विचार येण्याची संख्या कमी असते. त्यामुळेच सकारात्मक विचार मनात जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतात. कोणतीही क्रिया करण्यापूर्वी आपल्या मनात प्रथम विचार निर्माण होतात व तसे भाव निर्माण होतात नंतर मेंदू विचारांचे विश्लेषण करतो. त्यानंतर तो योग्य निर्णय घेतो व घेतलेला निर्णय आपल्या इंद्रियांकडे पोहचवितो. त्याप्रमाणे आपले इंद्रिय कार्य करतात.जर आपले विचार उच्च दर्जाचे असतील तरच आपले इंद्रिय कर्म चांगले करतील. त्यामुळे जर आपण नियमित उच्च दर्जाचे विचार करू लागलो तर निरंतर आपले कर्म चांगले होऊन आपले भाग्य उदयास येईल.बरेचदा आपल्या स्वभावामुळे, संस्कारामुळे व सवयीमुळे मेंदूचा विचारांचे विश्लेषण करून निर्णय घेणारा टप्पा गाळला जातो मग जसे आपले विचार तसे आपण इंद्रियामार्फत कार्य करत जातो. त्यामुळे सकारात्मक विचारांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकुमाराचा बुद्ध, वाल्याचा वाल्मिकी, राम्या माधुकरीचा रामशास्त्री, मानवाचा महामानव हे उच्च दर्जाच्या विचारांचेच फलित होय.