शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

येता सोबत काहीच नव्हते, जाता सारे येथेच राही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 13:41 IST

या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे.

या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे.एक दिवस सगळ्यालाच तुम्हाला रामराम करायचा आहे. अगदी तुमच्या शरीराचासुद्धा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. प्रत्येक जण कधी ना कधी जाणार. फरक ऐवढाच, काही लोक लवकर जातील तर काही उशीरा जातील. मृत्यू कधी येणार? कसा येणार आणि कुठे येणार? हे कोणीही सांगू शकत नाही.कोठे व्हावा जन्म आपला। मरणही कोठे कसे यावे?स्वाधीन नाही यातील काही। पदरी पडले गोड मानावे।।विश्वनियत्या प्रभुने साऱ्यांचे पासपोर्टस तयार करुन ठेवले आहेत. त्यावर शिक्केही मारले आहेत. तारखाही लिहुन ठेवलेल्या आहेत. तो दिवस आलाकी, तुम्हा-आम्हा सर्वांनाच मुकाट्याने इहलोकातून प्रस्थन करावे लागणार आहे. हे वास्तव आहे.काळाची हे उडी पडेल बा जेंव्हा। सोडविना तेंव्हा रावरंक।म्हणून संत सांगून गेले की, या जगात जगत असताना दोन गोष्टींचा कधीही विसर पडू देवू नका. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरे म्हणजे आपला मृत्यू. उद्या आपल्याला जायचे आहे याचाच विसर माणसाला पडला आहे. त्याची सारखी धावाधाव सुरु आहे या ब्रम्हांडाच्या पसाºयात आपले अस्तित्व नगण्य आहे. संकटाच्या क्षणी फक्त परमेश्वराचा आधार असतो ह्याची आठवण ठेवणे अगत्याचे आहे.अजुनी तरी होई जागा। तुका म्हणे पुढे दगा।।मृत्यूचा प्रवास खूप लांबचा आहे. ह्या प्रवासात तुमच्या मदतीला कोणीही धावून येवून शकत नाही. तुमच्या घरात अन्नधान्याचे भांडार असले तरी प्रवासाला निघतांना तुम्हाी चिमूटभर पीठही नेवू शकत नाही.उंच उंच माडी, लाल हवेली। हे घर म्हणशील माझेरेअखेर शेवटी तुझ्या नशीबी। स्मशानी काया उघडी रेसोन्या चांदीचे तांब्या पितळचे। हे भांडे म्हणशील माझे रेअखेर शेवटी तुझ्या नशीबी। मातीचे एक मडके रे।।पैसा खूप काही होवू शकतो पण सर्व काही कधीही होवू शकत नाही. ज्यांनी पैशालाच सर्वस्व मानले त्यांच्यावर आयुष्याच्या शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते. शिकंदर बादशहाने मरणापूर्वी आपल्या जवळ असलेली प्रचंड संपत्ती पाहिली. त्याचे डोळेअश्रूंनी भरले. कारण त्याला समजले की, ही अलोट संपत्ती आपल्यासोबत नेता येणार नाही.‘‘लाया तू क्या शिकंदर और साथ ले जा रहा क्या?दोनो हाथ थे खाली, बाहर कफनसे निकले।इकठ्ठे कर जहॉके जर, सभी मुल्कोके माली थे।सिकंदर जब गये दुनियासे, तो दोनो हाथ खाली थे।’’देश घडविणारी युगंधर व्यक्तीमत्त्वांची मांदियाळी ह्याच पद्धतीने मृत्युच्या द्वारापर्यंत पोहचली, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक माणसाने ही जाणीव ठेवूनच जीवनाचे कल्याण कसे होईल याचे वेळापत्रक करायला हवे. वेळापत्रकाप्रमाणे सर्व गोष्टी होतीलच असे नाही परंतु जीवनप्रवासाचा शेवट चांगला होईल. संतजणांनी आम्हाला सांगितले आहे की, एखाद्याची प्रेतयात्रा रस्त्यावरुन जाताना ‘अरेरे, बिचारा गेला’ असे कधीही म्हणू नका. कारण ह्याच रस्त्याने आपणाला जायचे आहे. अर्थी निघण्यापूर्वी आपण जीवनाचा अर्थ समजून घ्यायला हवा.‘‘कर्ता निमित्त मी, मज नको- चिंता काळाची मनी।ठेवा ईशनाम मुखी, गुरुला स्मरोनि- आनंद भोगाजनी।रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। मंत्र हा जपावा सर्वकाळ।।.- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे, शेगाव

टॅग्स :spiritualअध्यात्मिकSocialसामाजिकAkolaअकोला