शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

विज्ञानमय आत्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 06:22 IST

सामान्य माणूस हा विज्ञानमय प्रतलात त्याच्या मृत्यूनंतर जातो. तिथे सर्व शक्तिमान शक्ती व तिचे कायदे त्या व्यक्तीचे विज्ञानमय प्रतलातील निरनिराळ्या विभागातील तिचे नशीब ठरवितात.

-  डॉ. मेहरा श्रीखंडेसामान्य माणूस हा विज्ञानमय प्रतलात त्याच्या मृत्यूनंतर जातो. तिथे सर्व शक्तिमान शक्ती व तिचे कायदे त्या व्यक्तीचे विज्ञानमय प्रतलातील निरनिराळ्या विभागातील तिचे नशीब ठरवितात. मृत्यूनंतर विज्ञानमय शरीर भौतिक शरीरापासून कायमचे वेगळे होते व माणसाचे मृत्यूनंतरचे जीवन चालू होते. खूप वेळ या विज्ञानमय शरीराला आपण मेलेलो आहोत, हे कळत नाही व ते झोपाळलेल्या अवस्थेत राहते. खूप वेळा जे लोक अपघातात किंवा एकदम मरतात, त्यांच्याबाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. काही वेळा या व्यक्तींमधील शुद्ध आचरणाच्या व इच्छा न राहिलेल्या व्यक्तींची शरीरे उच्च विज्ञानमय प्रतलात जातात, परंतु ज्यांना मृत्यूनंतर हे जग सोडायचे नसते व त्यांचे हे विज्ञानमय वाहन खालील प्रतलात रेंगाळत राहाते. त्यांचा ज्यांच्याशी पूर्वी संबंध आला, अशा जगाशी व लोकांशी संबंध ठेवून राहाते. काही वेळा दु:ख करणारे नातेवाईक त्यांना पाठी बांधून ठेवतात व त्यांचे दु:ख व त्यांच्या आसक्त्या वरील प्रतलात जाण्याचे त्यांचे मार्ग रोखून धरतात.

खूप वेळा हे आत्मे त्यांच्या पाठी सोडलेल्या व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या परिस्थितीसंबंधी किंवा पृथ्वीवरील लोकांच्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टींविषयी त्यांना जागृत करण्यासाठी ही माध्यमे व गूढवादी यांच्याशी संपर्क साधतात. हे आत्मे काही वेळा आध्यात्माच्या प्रयोगात अडथळे आणतात. प्रयोगातील लोकांनी ज्या आत्म्यांना बोलावलेले असेल, त्या आत्म्यांच्या जागी हे आत्मे जाऊन बसतात. यावरून ते आत्मे प्रयोगात कुठल्या प्रकारचे प्रश्न निर्माण करत असतील, ते समजेल. काही वेळा प्रयोग संपल्यानंतरही हे आत्मे त्या माणसांभोवती व जागेभोवती रेंगाळत राहिलेले असतात.

काही विज्ञानमय आत्मे त्यांचा सहवास भौतिक जगाला दाखवण्यासाठी उतावीळ असतात व त्यासाठी हे दगड फेकणे, घंटानाद करणे व इतर अशा अनेक गोष्टींचा उपयोग करतात. यालाच आपण भुतांच्या करामती म्हणतो व त्या आपल्याला अनेक भुतांच्या गोष्टींमध्ये आढळतात. विज्ञानमय आत्मे सरळपणे बोलू किंवा लिहू शकत नाहीत. त्यांना जिवंत माध्यमांचा उपयोग करावा लागतो व जिवंत माणसांच्या दुहेरी प्राणमय कोषाची साथ घ्यावी लागते. हा दुहेरी प्राणामय कोष मध्यस्थ म्हणून काम करतो. सामान्य माणसांमध्ये हा दुहेरी प्राणमय कोष व भौतिक शरीरे ही सहजगत्या वेगळी करता येत नाहीत. हाच दुहेरी प्राणमय कोष माध्यमांच्या खोलीतील वैशिष्ट्यपूर्ण घटनांशी निगडित असल्याचे दिसून येते.

आत्म्ये आणि त्यांचा वावर याबाबत सर्वसामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते. गूढ वर्तुळ या आत्मे आणि त्यांच्याशी निगडित विषयांमध्ये असते. म्हणूनच अनेक जण याबाबत उपलब्ध माहिती गोळा करून, त्याचा अभ्यास करीत असतात वा त्याचे संकलन करतात. भारतात अनादी कालापासून त्याबाबत कुतूहल आहे. मात्र, भारतातच नव्हे, तर परदेशांतही आत्मे आणि त्यांचा वावर याबाबत उत्सुकता आढळते. त्यासंबंधी विपुल साहित्यही उपलब्ध आहे. अनेक माध्यमांतून आत्म्यांचा विषय हाताळला जातो. आधुनिक जगतातही अनेकांना या विषयाबाबत जाणून घ्यायचे असते. या विषयावर अनेक क्षेत्रांतील मान्यवर चर्चा करण्यास आणि अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त करीत असतात.