शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विपश्यनेचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 05:36 IST

बुद्धांचे उपदेश अधिक स्पष्ट होत होते. कोठे थोडेसुद्धा दोष नव्हते, शब्दाशब्दांत अमृत रसपान होते.

- फरेदुन भुजवालाविपश्यना शिबिरात नितांत शुद्ध धर्माचाच अभ्यास केला असल्याचे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ ते म्हणतात, शिबिरात पंचशीलाचे पालन केले़ चित्ताच्या एकाग्रतेसाठी समाधीचा अभ्यास केला आणि नंतर जेवढी शक्य आहे तेवढी प्रज्ञा जागृत करून चित्त विशुद्धीचा प्रयत्न केला़ या तिन्हींच्या अभ्यासात कोठे काही दोष दिसून आला नाही़ शरीर आणि वाणीच्या दुष्कर्मांपासून अलिप्त राहून शील आणि सदाचार पालनाचा वैदिक धर्मच नाही, तर जगातील सर्व धर्म स्वीकार करतात़ सर्वच याला चांगले म्हणतात़ हजारो उपदेश ऐकत राहिलो तरीही मनाला वश केल्याशिवाय शील पालन करणे शक्य नाही, हे सर्वांना माहीत आहे़ तेथे मन वश करण्याचा अभ्यास शिकविला गेला़ त्यासाठी स्वाभाविक श्वासाचे आलंबन दिले गेले़ तेसुुद्धा असे निर्दोष आणि सार्वजनिक आहे, की त्याचा प्रयोग सर्व करू शकतात़ भगवान गौतम बुद्धांनी सांगितले,सब्बपापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा।सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धनसासनं।।सर्व पापकर्मांपासून अलिप्त राहणे, कुशल कर्माची संपत्ती प्रात्प करणे आणि आपले चित्त परिपूर्ण रूपाने शुद्ध करणे हाच भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे़ हेच शील, समाधी, प्रज्ञा आहे़ भगवान गौतम बुद्ध केवळ उपदेशच देत नाहीत, तर त्याचा प्रयोगात्मक अभ्यास कसा करावा हे शिकवतात़ म्हणून बुद्धांचा उपदेश फलदायी असतो़ पहिल्या सत्रात हे सत्य खूप समजू लागले आणि वाटले की बुद्धांच्या विद्येचा हा व्यावहारिक पक्ष खरोखर मोठा विलक्षण, अद्भुत आणि अनमोल आहे, असे गोएंका यांनी नमूद केले़ ते म्हणतात, एकीकडे विपश्यनेचा गंभीर व्यावहारिक अनुभव आणि दुसरीकडे बुद्धवाणीचासैद्धान्तिक अभ्यास हे दोन्ही बरोबरीने चालले होते. त्यामुळेच बुद्धांचे उपदेश अधिक स्पष्ट होत होते. कोठे थोडेसुद्धा दोष नव्हते, शब्दाशब्दांत अमृत रसपान होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक