शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म - विभूतींचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 05:49 IST

मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या

आपला विभूतीयोग भक्तश्रेष्ठ अर्जुनाला सांगताना भगवंत मोठ्या पे्रमाने म्हणाले की,अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन।विष्टभ्याहमिदं कृत्स्त्रमेकांशन स्थितो जगत।।पार्था, मी कुठल्या कुठल्या विभूतींनी त्रैलोक्याला व्यापले आहे, त्याविषयी तुझ्या शुद्ध मनात जे भावविश्व निर्माण झाले आहे ते तुला थोडक्यात माझ्या मुख्य विभूती कथन करीतच सांगितल्या होत्या. तरीही आता साररूपात कथन करतो ते श्रद्धापूर्वक श्रवण कर, माझ्या सर्व विभूती जाणून घेण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या केवळ एका अंशानेच संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेले आहे. एवढेच फक्त ध्यानात ठेव. तू फक्त मलाच जाणून घे. तेवढेच पुरेसे होईल. भगवंतांना भक्तश्रेष्ठ अर्जुनाने विनंती केली की, भगवंता, केवळ एका अंशाने हे ब्रह्मांड व्यापलेले आहे. आपल्या असंख्य विभूती आहेत. माझ्या मर्त्य नजरेने मला या तुमच्या सर्व दिव्य विभूती, तुमची परमकृपा झाल्याशिवाय कधीच पाहता येणार नाहीत. माझी योग्यता असेल तर, आपण मला आपल्या सर्व विभूतींचे दर्शन घडवाल का? अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा ऐकून भगवंत मनोमनी सुखावले आणि त्यांनी आपल्या या परमभक्ताला आपले विश्वरूप दाखवण्याचे निश्चित केले. भगवंत म्हणाले,पश्य मे पार्था रूपाणि शतशो थ सहस्त्रश:।नानााविधानि दिव्यानि नानावर्णाकतीनि चपार्था, माझे ब्रह्मांड भव्य स्वरूप एकदाच फक्त माता यशोदेला गोकुळात असताना बालपणी दाखवले होते हे सत्य आहे. त्यानंतर आजपर्यंत दडवून ठेवलेले हे अतिभव्य स्वरूप मी फक्त तुलाच दाखवणार आहे. हजारो ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या करून, हे माझे दिव्य स्वरूप पाहण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु तू माझा परमभक्त आहेस, म्हणून तुझी ही विश्वरूप पाहण्याची इच्छा मी या भाग्यक्षणी पूर्ण करणार आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक